शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

कोरोनाचा रुग्ण आढळल्यास रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचीही चाचणी करावी : महापौर नरेश म्हस्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 5:44 PM

सर्वसाधारण आजारासाठी नागरिक खाजगी रुग्णालयात तपासणीसाठी जात असतात, परंतु काही दिवसापूर्वी रुग्णांची कोणतीही पार्श्वभूमी न तपासता रुग्णांवर उपचार केले गेले.

ठाणे : सर्दी, खोकला, ताप अशा किरकोळ आजारासाठी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांकडे दुर्लक्ष न करता सध्याच्या कोरोना आजाराचे गांभीर्य लक्षात घेवून अशा रुग्णांची संपूर्ण तपासणी करताना त्यांनी परदेश प्रवास केला असल्यास त्याची माहिती घेवून त्यांच्या आजाराचे योग्य निदान होईल या दृष्टीने सर्वच रुग्णालयांनी सतर्क रहावे, तसेच एखाद्या रुग्णांबाबत कोरोनासदृश लक्षणे आढळल्यास त्याची माहिती महापालिका प्रशासनास तात्काळ देवून सहकार्य करावे असे आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी ठाण्यातील सर्व रुग्णालयांना केले आहे.

सर्वसाधारण आजारासाठी नागरिक खाजगी रुग्णालयात तपासणीसाठी जात असतात, परंतु काही दिवसापूर्वी रुग्णांची कोणतीही पार्श्वभूमी न तपासता रुग्णांवर उपचार केले गेले. ठाण्यातील एका रुग्णालयात कोरोनाबाधीत रुग्ण दाखल झाला होता, परंतु या रुग्णाची कोणतीही माहिती न घेता त्याच्यावर किरकोळ औषधोपचार करुन सोडण्यात आले. परंतु सदर आजार बरा न झाल्यामुळे त्यांनी दुसऱ्या रुग्णालयात उपचार घेतले असता या दरम्यान करण्यात आलेल्या चाचणीमध्ये त्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न् झाले, अशा वेळी रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका व इतर कर्मचारी वर्ग यांची देखील कोरोना चाचणी करणे आवश्यक असून महापालिका प्रशासनास देखील कळविणे गरजेचे आहे. ही बाब ठाणे महापालिकेच्या आरोग्य केंद्र प्रमुख वर्षा ससाणे  व राणी शिंदे यांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आली. याबाबत महापौर नरेश म्हस्के यांनी संबंधित रुग्णालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांना वैद्यकीय तपासणी करण्यास भाग पाडले असून याबाबतची माहिती ते दररोज सर्व आरोग्य केंद्रप्रमुखांकडून घेत आहेत.

काही रुग्णालयामध्ये उपचार घेतलेल्या रुग्णांपैकी काही रुग्ण कोरोना संक्रमित असल्‌याचे आढळून येत आहे, रुग्णालयात काम करणारे कर्मचारी हे  ठाणे शहरातील मध्यमवर्गीय, झोपडपट्टी विभागातील असून त्यांचेपासून परिसरातील नागरिकांना देखील धोका पोहचू शकतो ही गंभीर बाब आहे. तरी सद्यस्थीतील ठाणे शहरातील ज्या व्यक्ती कोरोनाबाधीत झाल्याचे निष्पन्न  झाले असून त्यांनी ज्या रुग्णालयात उपचार घेतलेले आहेत अशा सर्व रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका व  त्यांचे संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीची वैद्यकीय तपासणी करुन घेण्यात यावी असे आदेश देखील महापौर नरेश म्हस्कें यानी सर्व खाजगी रुग्णालयांना दिले आहेत.

तसेच ठाणे शहरातील खाजगी रुग्णालयामध्ये यापुढे तपासणी व उपचारार्थ दाखल होणाऱ्या प्रत्येक रुग्णाची पाशर्वभूमी जाणून घेवून त्यांच्यावर उपचार करावेत, जेणेकरुन कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी निश्चीतच मदत होईल व कोरोनासदृश्य रुग्ण आढळून आल्यास त्याची माहिती महापालिका प्रशासनास देवून पुढील अनर्थ टाळण्यासाठी दक्ष राहून सहकार्य करावे असे आवाहन महापौरांनी केले आहे.

टॅग्स :tmcठाणे महापालिका