शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

वसतिगृहातील जेवणात अळ्या, कंत्राटदाराला नोटीस, कल्याणमध्ये विद्यार्थ्यांचे अन्नत्याग आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 6:10 AM

पश्चिमेकडील बिर्ला कॉलेजनजीक सरकारी आदिवासी विद्यार्थी वसतिगृह आहे. येथील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाºया जेवणात अळ्या आढळल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. येथे जेवण पुरविणा-या कंत्राटदाराच्या विरोधात कारवाई करण्याच्या

कल्याण : शहराच्या पश्चिमेकडील बिर्ला कॉलेजनजीक सरकारी आदिवासी विद्यार्थी वसतिगृह आहे. येथील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाºया जेवणात अळ्या आढळल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. येथे जेवण पुरविणा-या कंत्राटदाराच्या विरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या प्रकरणी विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली आहे. जेवण पुरविणाºया कंत्राटदाराला नोटीस बजावण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.या आदिवासी वसतिगृहात राहून ९६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना दोन वेळचे जेवण पुरविण्याचे काम भिवंडीच्या जागृती महिला बचत गटाला दिले आहे. शुक्रवारी या विद्यार्थ्यांना पनीरची भाजी दिली होती. त्या भाजीत अळ्या असल्याचे विद्यार्थ्यांनी उघडकीस आणले आहे. तसेच त्या दिवशी मुलांना दिलेल्या केळ्यांना देखील कीड लागल्याचे दिसले. याविषयी प्रथम महिला बचत गटाकडे विद्यार्थ्यांनी विचारायचा प्रयत्न केला असता, त्यांना दमदाटी करण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. एका विद्यार्थ्याच्या जेवणामागे महिन्याला ३ हजार २०० रुपये सरकारकडून महिला बचत गटाला दिले जातात. विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. वसतिगृह प्रशासनाकडून यापूर्वीच महिला बचत गटाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मात्र आता अळ्या आढळून आल्या त्याचे काय, असा सवाल विद्यार्थ्यांकडून केला जात आहे. प्रकल्प अधिकारी एल. एफ. सलामे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी आपण गावी आल्याने तेथे जाता आले नाही. पण आम्ही आमच्या दुसºया अधिकाºयाला तेथे पाठविले आहे. दुसºया कंत्राटदाराची व्यवस्था करण्यासही सांगितले असून यापुढे या कंत्राटदाराकडून जेवण घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले.शिवसेनेचे उपशहरप्रमुख रवी पाटील यांनी रविवारी वसतिगृहाला भेट देऊन पाहणी केली. वसतिगृहाची दुरवस्था झाली असून विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जाते. त्यात अळ्या सापडतात, ही गंभीर बाब आहे. वसतिगृहाची देखरेख करणारा अधिकारी कल्याणमध्येच राहतो. मात्र वर्ष झाले तरी तो या वसतिगृहाकडे ढुंकूनही पाहत नाही, असा आरोप पाटील यांनी केला आहे.तक्रारी नेहमीच्याचया वसतिगृहात राहणारा विद्यार्थी सागर मुठे याने सांगितले की, दीड महिन्यापूर्वीच या कंत्राटदाराला कंत्राट दिले आहे. तेव्हापासून त्यांच्या काही ना काही तक्रारी दररोज आहेत.सुरुवातीला विद्यार्थ्यांना जेवण कमी पडत असे. त्यासंदर्भात बैठकही घेतली होती. दरम्यानच्या काळात, दिवाळीच्या सुट्टीत मुले घरी गेली. विद्यार्थी परतल्यावर परिस्थितीत सुधारणा होईल, असे वाटत होते.परंतु आजही परिस्थिती जैसे थेच आहे. १२ तारखेला यासंदर्भात आम्ही वॉर्डनला निवेदन दिले होते. पण त्यावर कारवाई झाली नाही.हे आमच्या विरोधातील कारस्थानजागृती महिला बचत गटाचे व्यवस्थापक सुरेश वाडघरे यांनी सांगितले की, आम्ही १५ आॅक्टोबरला या वसतिगृहाचे कंत्राट घेतले. येथे एक मुलगा जेवायला येतो, तेव्हा सहा-सात जणांची ताटे घेऊन जातो. आपल्यासोबत मित्राचे ताट घेऊन गेल्याने अनधिकृत विद्यार्थ्यालाही जेवण मिळते.या वसतिगृहात ३० मुले अनधिकृतरीत्या राहतात. सुरुवातीला आम्ही त्यांनाही जेवण देत होतो, परंतु आता ते आम्ही बंद केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आमच्यावर राग आहे. आम्हाला येथून हटविण्यासाठी हे कारस्थान केले जात आहे.आम्ही जेवणात अळ्या का टाकू? डॉक्टरांनी तेल बदलण्यासाठी सांगितले त्या वेळी आम्ही ते लगेचच बदलले. विद्यार्थी खोटे सांगत आहेत. विद्यार्थ्यांना नाश्त्यामध्ये शिरा, उपमा, साबुदाणा खिचडी, फळे आणि दूध दिले जाते. तसेच जेवणातही ५ चपात्या, पोटभर भात, दोन भाज्या, लोणचे यांचा समावेश असतो.

टॅग्स :Studentविद्यार्थीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार