शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपमध्ये तिसऱ्या दिवशीही राजीनामे थांबेनात; 72 नेत्यांचा पक्षाला रामराम
2
मंगलमूर्ती मोरया! सिंह रथातून दिमाखदार मिरवणूक, श्रीमंत दगडूशेठ जटोली शिवमंदिरात विराजमान
3
पैसे तयार ठेवा! Ola electric नंतर आता येणार Ather Energy चा IPO
4
"महायुतीत एकमेकांविषयी..."; अर्थखात्याबाबत गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यावर नार्वेकरांचे स्पष्टीकरण
5
जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच एक संविधान, एक तिरंग्याखाली मतदान…,अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
6
"जे आम्हाला पदक न मिळाल्याने आनंदी होतात, ते स्वत:ला देशभक्त..."; बजरंग पूनियाने दिले ब्रिजभूषण सिंह यांना प्रत्युत्तर
7
Congress Candidate : तुरुंगात असलेल्या 'या' नेत्याला काँग्रेसने दिले तिकीट
8
जाणून घ्या सेकंड हँड कारचे फायदे तोटे; सणासुदीच्या काळात अनेक कार विकायला आल्या असतील...
9
"मी हत्या केली नाही, मला..."; आरोपी संजय रॉय पॉलिग्राफ टेस्टमध्ये काय सांगितले?
10
जबरदस्त! iPhone सह Watch Series 10 देखील होणार लाँच; मोठा डिस्प्ले, अपग्रेड चिप मिळणार
11
Video : संतापजनक! तरुणीच्या गाडीला धडक, रिक्षाचालकाने पोलिसाच्याही लगावली कानशिलात
12
परदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक, ९ जणांना अटक!
13
बाप्पाच्या साक्षीनं MI नं दिली मोठी हिंट; या खास 'फ्रेम'मध्ये दडलंय रोहितवरील 'प्रेम' अन् बरंच काही
14
'तुम्ही फसवणूक करून ज्युनियर खेळाडूंचा हक्क ..."; ब्रिजभूषण सिंह यांचा विनेश फोगटवर निशाणा
15
कोकणातील या गावात चतुर्थीला करत नाहीत घरगुती गणपतीचं पूजन, असं आहे कारण
16
कोणती बँक देते सर्वात स्वस्त होम लोन? जाणून घ्या गृहकर्जांचे व्याजदर
17
मुंबई-गोवा महामार्गावर एसटी बसला अपघात; २५ प्रवासी जखमी
18
बजरंग पुनिया-विनेश फोगटचा काँग्रेसमध्ये प्रवेश; काय म्हणाले भाजप नेते ब्रिजभूषण शरण सिंह? पाहा VIDEO
19
मराठमोळ्या अभिनेत्याचा पार पडला साखरपुडा, फोटो आले समोर
20
PM नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्यात मोठे फेरबदल, UNGA ला संबोधित करणार नाहीत

कडाक्याच्या उन्हात ग्रामीण भागात महिलांची वाळवणासाठी लगबग

By admin | Published: April 11, 2017 2:25 AM

मार्च ते मे या कडक उन्हाळ्याच्या तीन महिन्यांत ग्रामीण भागातील महिलांची वर्षभराच्या वाळवणाची लगबग सुरू झालेली आहे. गावागावांत घरासमोरील अंगणांत एखादी

- उमेश जाधव,  टिटवाळा

मार्च ते मे या कडक उन्हाळ्याच्या तीन महिन्यांत ग्रामीण भागातील महिलांची वर्षभराच्या वाळवणाची लगबग सुरू झालेली आहे. गावागावांत घरासमोरील अंगणांत एखादी रांगोळी काढल्याप्रमाणे वाळवणाचे पदार्थ ठेवलेले आढळतात.उन्हाळा सुरू झाल्यापासून ग्रामीण भागातील महिलांना वाळवणाचे वेध लागतात. उडीद व मुगाचे पापड, तांदूळ व गव्हाच्या कुरडया, पापड्या, खारवड्या, सांडगे, चिकवड्या, कोंडवड्या, मिरगुंड यांच्या वाळवणाने सारे अंगण भरून गेलेले असते. घरातील कॉट, टेबल, खुर्च्या अंगणांत मांडून त्यावर वाळवणाचे पदार्थ पसरलेले असतात. याचबरोबर वर्षभरासाठी लागणारे मसाले, कडधान्य, लाल मिरच्या, हळकुंड, जिरे, राजिणे, कोकम, चिंच, तांदूळ, फाटी(सरपण)आदी जीवनावश्यक वस्तूंना कडकडीत उन्हं लावून ती कीड लागू नये, याकरिता जपून ठेवली जातात. त्यांची यासाठीधावपळ सुरू आहे. घरासमोरील अंगणात उन्हातान्हाची तमा न बाळगतामहिला, मुली वाळवण घालताना आणि त्याची राखण करताना दिसतात. काही ठिकाणी आजूबाजूच्या दोनचार घरांतील महिला एकत्र येऊन वाळवण करतात. ग्रामीण भागालगत असलेल्या कल्याण, डोंबिवली, ठाणे यासारख्या शहरांत वाळवणाकरिता जागा उपलब्ध नाही आणि महिलांकडे पुरेसा वेळ नाही. त्यामुळे अनेक महिला तयार पापड, कुरडया, तिखट, हळद, कोकम, चिंच बाजारातून विकत आणतात. या शहरांमधील अनेक दुकानांमध्ये हे जिन्नस विक्रीकरिता ठेवले जातात. त्यामुळे ग्रामीण भागातील काही महिला हातखर्चाला पैसे हवे म्हणून कुटुंबाच्या गरजेपेक्षा जास्त वाळवण करतात. त्याची स्थानिक व्यापारी, महिला बचत गटांना विक्री करतात. हीच घरगुती उत्पादने आकर्षक पॅकिंगद्वारे शहरांमधील दुकाने, मॉलमध्ये चढ्या किमतीत विकली जातात.वयोवृद्ध महिलांच्या मार्गदर्शनाखाली वाळवण केले जाते. सुक्या मासळीचे वाळवणही याच काळात सुरू असते. मांदेली, ढोमेली, वाकटी, जवळा, सुकट, बोंबील, माकली अशी विविध प्रकारची सुकी मच्छी कोळीवाडे व अन्य काही भागांत वाळवताना दिसत आहेत. पावसाळ्यात जेव्हा समुद्रातील मासेमारी बंद असते, तेव्हा हीच सुकी मासळी जेवणाची लज्जत वाढवते, असे मत्स्यप्रेमींचे म्हणणे आहे. पावसाळ्यात ग्रामीण भागातील शेतीवर पोट असलेली कुटुंबे त्याच कामात गढून जातात. अशावेळी उन्हाळ्यात केलेले वाळवण शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे दोनवेळा पोट भरायला उपयोगी पडते.सध्या सुरू असलेले वाळवण आम्हाला वर्षभर पुरवावे लागते. पावसाळ्यात याचा खूप वापर होतो. या सर्व खाद्यपदार्थांना व्यवस्थित उन्हं दिली नाही, तर ती खराब होतात. त्यानंतर, त्यांची साठवण हेही तेवढेच जोखमीचे काम असते.-कुसुम जाधव व ऊर्मिला जाधव, गृहिणी, फळेगाव