शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

ठाण्यातील हॉटेल व्यावसायिकांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2021 6:39 PM

ठाण्यातील हॉटेल व्यावसायिकांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोरोनामुळे ठाणे जिल्ह्याला घातलेल्या विळख्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर दुसरीकडे हॉटेल्स, बार अँड रेस्टोरंट यांच्यावरही उपासमारीची वेळ आली  आहे. कोरोनाच्या काळात हॉटेल मालकांना चांगलाच फटका बसला आहे. त्यात नवीन नियमावली आणि कडक निर्बंधामुळे हॉटेल मालकांनी मुख्यमंत्र्यांनी यावर तोडगा काढावा अशी कळकळीची विनंती हॉटेल मालकांनी केली आहे. तसेच  राज्य उत्पादन शुल्क विभागाची वार्षिक फी भरण्यासाठी पैसे नसल्याने आणि त्याशिवाय बार अँड रेस्टोरंट चालविणो शक्य नसल्याने ठाण्यातील सर्वच बार अँड रेस्टोरंटमध्ये काही दिवसापूर्वी मद्यविक्र ी बंद करण्यात आलेली होती.  सरकारला महसूल हवा असल्यास त्यांनी सवलत द्यावी असा सूर ठाणे  हॉटेल असोशिएशनच्या वतीने लावला आहे. तसेच गुरवारी ठाण्यात मुक आंदोलनही करण्यात आले.

  देशात आणि खासकरून महाराष्ट्रत कोरोनाने अगदी थैमान घातले असून देशातील एकूण बाधिता पैकी जवळपास ३० टक्के रु ग्ण हे हे केवळ महाराष्ट्रातून येत आहेत. वाढती रु ग्णसंख्या पाहता सरकारने अनेक पाऊले उचलली आहेत. त्याची कु:हाड हॉटेल व्यावासायावर कोसळली आहे. रात्री आठ वाजेपर्यंत पार्सल सव्र्हीसाठी उघडी असलेली हॉटेल्स सरसकट बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे त्रस्त झालेल्या ठाण्यातील या व्यवसायातील सर्वांनीच एकत्र येत गुरवारी मूक आंदोलन केले. लाखोंची कर्जे आणि मिळकत शून्य झाल्याने या व्यवसायाशी निगडीत अनेकांनी एकत्र येत सरकारला निर्बंध शिथिल करण्याची विनंती केली. लवकरच हॉटेल उघडली नाहीत तर बायकामुलांना घेऊन आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरणार नाही असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.गावरून नौकरीसाठीच आलो, कुटुंबाच्या उदरिनर्वाहाची चिंता आहे, मुलांच्या शिक्षणाचा खर्च डोक्यावर आहे. तर दुसरीकडे राज्यसरकारच्या नव्यानव्या नियमांमुळे हॉटेल, बार  बंद पडले, आता आमच्यावर उपासमारीची वेळ आली. उपासमारीच्या उंबरठ्यावर आलेल्या हॉटेल आणि बार मालकासह बारमधील हातावरचे पोट असलेले कर्मचारी यांनाही गुरवारी मुक आंदोलन करून सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. मिशन बिगेन अगेन नंतर ब्रेक द चैन, माझे  कुटूंब माझी जबाबदारी अशी ब्रीदवाक्य सांगतात.  परंतु माझे   कुटुंब  माझी  जबाबदारी, मग सरकारची काही नैतिकता आहे की नाही असा सवाल आता कर्मचारी वर्गाने उपस्थित केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी सहकार्य करावे, तीन प्रकारचे टॅक्स भरत आहोत, त्यानंतर आता पुन्हा मोठा भार डोक्यावर आला आहे. कामगारांना पगार, राहणो करीत आहोत. आम्ही देखील व्यावसायिक आहोत, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यावर विचार करुन लवकरच तोडगा काढावा.(चंद्रशेखर शेटटी - ठाणे  हॉटेल असोसिएशन, उपाध्यक्ष)

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस