ठाणे : कोपरी येथील आदर्श नगरात सोमवारी भरदिवसा सुमारे ३ लाख रुपयांची घरफोडी झाली. आरोपींनी कुलूप तोडून घरातील दागिने लंपास केले.आदर्श नगरातील शिवकृपा सोसायटीमध्ये आशिष अतुल जोशी आणि त्यांची पत्नी अभियंता आहेत. सोमवारी सकाळी ९.३0 वाजताच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे कामावर गेले. दुपारी २ वाजताच्या सुमारास दोन अज्ञात चोरांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून दागिने लंपास केले. आशिष जोशी यांनी सोमवारी कोपरी पोलिसांकडे याबाबत तक्रार दिली. तक्रारीमध्ये २ लाख ९६ हजार रुपयांचे दागिने चोरी गेल्याचे त्यांनी म्हटले. मात्र घरी गेल्यानंतर चौकशी केली असता ही चोरी जवळपास ३ लाख ३0 हजार रुपयांची असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पोलीस निरीक्षक डी.एच. भदाणे यांनी या प्रकरणाची चौकशी केली. इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. या फुटेजमध्ये दोन व्यक्ति सोसायटीमध्ये प्रवेश करताना आणि पायºया चढताना, तसेच उतरताना दिसत आहेत. पोलिसांनी सोसायटीमध्ये चौकशी केली असता, ते तेथील रहिवासी नसल्याचे समजले. याशिवाय त्यांची सोसायटीत येण्याची वेळ आणि चोरीची वेळ तपासली असता, तेच आरोपी असावेत, अशी पोलिसांना शंका आहे. त्याअनुषंगाने या आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक डी.एच. भदाणे यांनी दिली.
ठाण्यातील कोपरी येथे भरदिवसा ३ लाखांची घरफोडी, दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 8:32 PM
कोपरी येथील एका सोसायटीमध्ये राहणारे कुटुंब सोमवारी कामानिमित्त बाहेर गेले असता अज्ञात चोरांनी भरदिवसा सुमारे ३ लाख रुपयांची घरफोडी केली.
ठळक मुद्देदोन आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैदआरोपींचा शोध सुरूकोपरी येथे गुन्हा दाखल