अजित मांडके ठाणे : मागील वर्षी कोरोनामुळे गौरी गणपती उत्सवासाठी चारकमाण्यांना कोकाणात जाण्यास मिळाले नव्हते. परंतु यंदा मात्न गणोशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भक्तांसाठी ठाणे एसटी विभागामार्फत १००१ बसचे नियोजन आखले होते. मात्र आता ही संख्या वाढली असून आतार्पयत १३२५ लालपरीचे बुकींग फुल झाल्याची सुखद बातमी समोर आली आहे. गणेश भक्तांनी यंदा लालपरी अर्थात एसटीला पसंती दिल्याचे दिसून आले आहे.
३१ ऑगस्ट रोजी श्री गणेश चतुर्थी आहे. त्यानुसार गौरी गणपती या सणाला येत्या २६ ते ३० ऑगस्ट दरम्यान जादा वाहतुक केली जाणार आहे. तर संगणकीय आरक्षण प्रणालीमध्ये ६० दिवस अगोदर आरक्षण करण्याची सोय उपलब्ध असल्याने यावर्षी गौरी गणपती जादा वाहतुकीसाठी २८ जून पासून आरक्षण सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गतवर्षी म्हणजे २०२१ मध्ये ठाणे विभागातून ८४६ एसटी बस आरक्षित करून सोडण्यात आल्या होत्या. यंदा ठाणो विभागाने कोकणात जाणा:या गणोशभक्तांसाठी १००१ बसचे नियोजन केले होते. सुरवातीला बुकींगला थंडा प्रतिसाद दिसून आला होता. मात्र आता तब्बल १३२५ बसचे बुकींग झाले आहे. त्यामुळे आता येत्या २६ ऑगस्ट पासून गणोशभक्त कोकणात जाणार आहेत.
निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ग्रुप बुकींग जोरात यावर्षी महानगरपालिका क्षेत्नात निवडणुक होणार असल्याने राजकीय पक्ष यांचेकडुन जास्तीतजास्त प्रमाणात ग्रुप आरक्षण होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यानुसार आता ९०७ गाडय़ांचे ग्रुप बुकींग झाल्याची माहिती एसटी विभागाने दिली आहे. तर इतर बुकींगची संख्या ही ४१८ एवढी असल्याचे दिसत आहे.
येथून सुटणार बसडेपो - संख्याबोरीवली - २८४ठाणो - ५४२कल्याण - ३४६विठ्ठलवाडी - १४३