डोंबिवली : पश्चिमेतील धोकादायक बनलेल्या नागूबाई निवासच्या रहिवाशांना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कचोरे येथील बीएसयूपीच्या घरांच्या चाव्या देण्यात आल्या. रहिवाशांना तात्पुरता निवारा मिळाला असला, तरी त्यांच्या व्यथा कायम आहेत. कचोरे येथे पाण्याच्या दुर्भिक्षाबरोबर असुविधांचा सामना त्यांना करावा लागत आहे. त्यामुळे आगीतून फुफाट्यात आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.बीएसयूपी प्रकल्पात राहायला गेल्यापासून चार दिवस झाले, पण पाण्याचा पत्ता नाही. नोकरी-कामानिमित्त घरातील पुरुष बाहेर जातात. त्यामुळे गृहिणींना मात्र त्याच संकुलातील अन्य इमारतींच्या टाकीतून पाणी भरावे लागत असल्याने प्रचंड हाल होत आहेत, असे रहिवाशांनी सांगितले. पालकमंत्री शिंदे यांनी घरांचा ताबा दिल्यानंतर काही काळ महापौर राजेंद्र देवळेकर होते, पण आता कोणीही येत नसल्याचा संताप प्रसाद भानुशाली यांनी व्यक्त केला.कचोरे हे ठिकाण कल्याण असो की डोंबिवली, या दोन्ही प्रमुख शहरांच्या जवळपास नाही. येथे कोणतीही बाजारपेठ नाही की, कसलीच सुविधा नाही. त्यामुळे एका कोपºयात आल्यासारखे आम्हाला वाटत आहे. देवी चौकात आम्ही लोकांमध्ये राहतोय, असे वातावरण होते. आता मात्र कोनाड्यात आल्यासारखे वाटते. कल्याण असो की डोंबिवली स्थानक गाठण्यासाठी रिक्षाला एका वेळेला १०० रुपयांची नोट मोडावी लागते. एवढी वर्षे डोंबिवलीतील देवी चौकात राहिलो. गॅस एजन्सी, बँक, मुलांच्या शाळा, शिकवण्या, किराणा दुकान हे सगळे काही तेथे आहे. त्यामुळे आता येथे आल्यावर प्रत्येक व्यवहारासाठी जुन्या जागेत, त्या परिसरात जावे लागत आहे. अनंत अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने रहिवासी त्रस्त आहेत.पाणी नसल्याने अजूनही काही घरांमध्ये अन्न शिजलेले नाही. गॅस आहे, तर शेगडी नाही, असा सगळा विस्कळीतपणा सुरू आहे. काय करावे उमजत नाही. त्यामुळे घरमालकाने येथे यावे आणि आमची स्थिती बघावी, असेही एक रहिवासी म्हणाले.मालकाची भूमिका अस्पष्टमुख्यमंत्र्यांमुळे निवारा तर मिळाला, पण तो किती दिवस असेल, याची शाश्वती नाही. मालक पुढे काय करणार, हे देखील स्पष्ट करत नाही. घरांचा प्रश्न ऐरणीवरच आला असल्याने रहिवासी हवालदिल झाले आहेत.
बीएसयूपीच्या घरांमध्येही हाल, ‘नागूबाई’वासींची व्यथा, पाण्यासाठी वणवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2017 4:28 AM