शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

ठाण्यातील छोटया रुग्णालयांमध्ये ‘सोशल डिस्टन्स’ पाळणार कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 7:34 PM

केवळ १० ते १५ फूटांच्या छोटया दवाखान्यात किंवा नर्सिंग होममध्ये हे सोशल डिस्टन्स कसे ठेवणार, असा प्रश्न ठाण्यातील वैद्यकीय व्यावसायिकांना पडला आहे.

ठळक मुद्देडॉक्टरांचा सवालअवघ्या १० ते १५ फूटांच्या डिस्पेन्सरीमध्ये कोरोनाची नियमावली पाळणे अवघड

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळण्याचा आदेश राज्य शासनाने दिला आहे. मात्र, केवळ १० ते १५ फूटांच्या छोटया दवाखान्यात किंवा नर्सिंग होममध्ये हे सोशल डिस्टन्स कसे ठेवणार, असा प्रश्न ठाण्यातील वैद्यकीय व्यावसायिकांना पडला आहे. गर्दीमुळे संसर्ग झाल्यास जबाबदारी कोणाची, असा सवालही या डॉक्टरांकडून केला जात आहे.आम्ही फॅमिली डॉक्टर म्हणून अगदी व्हॉटसअ‍ॅपद्वारेही औषधे लिहून देत मोफत सेवा देत असताना, सर्व दवाखाने व नर्सिंग होम उघडण्याचा अट्टाहास कशासाठी? असाही सवाल त्यांनी केला आहे. साथरोग प्रतिबंधात्मक अधिनियम १९८७ अन्वये ठाणे महापालिकेचे आयुक्त विजय सिंघल यांनी नोंदणीकृत रुग्णालये, वैद्यकीय व्यावसायिकांच्या आस्थापना बंद राहिल्यास परवाना बंद करण्याबरोबरच फौजदारी कारवाईचा इशारा दिला आहे. या आदेशाने ठाणे शहरातील नर्सिंग होम चालक डॉक्टर आणि जनरल वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांमध्ये अस्वस्थता आहे. बहुसंख्य डॉक्टरांचे दवाखाने छोटेखानी दुकानांच्या गाळयात सुरु आहेत. तर एक हजार फुटांपेक्षा कमी जागेत नर्सिंग होम सुरु आहेत. बहुसंख्य डिस्पेन्सरी १० ते १२ फूट लांब जागेत आहेत. या जागेतच तपासणी कक्ष, रुग्णांसाठी आसन व्यवस्थाही आहे. आता भारतात कोरोना चा तिसरा टप्पा सुरू होत आहे. अशा परिस्थितीत एखादा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास त्याला जबाबदार कोण, असा डॉक्टरांचा सवाल आहे. ठाण्यातील अनेक मोठयारुग्णालयातील ओपीडीची जागाही कमी आहे, याकडेही या डॉक्टरांनी लक्ष वेध आहे.* छोटया वैद्यकीय व्यावसायिकांकडे जाणारे बहुतांशी रु ग्ण हे फॅमिली पेशंट वर्गातील आहेत. या पेशंटना डॉक्टरांचा मोबाईल क्र मांकही माहित आहे. त्यांना डॉक्टरांकडून व्हॉटसअ‍ॅपवर मोफत मार्गदर्शन केले जाते. आपत्कालीन परिस्थितीत मोठी जागा असलेल्या रु ग्णालयात दाखल केले जाते. त्यानंतर त्यांची तिथे तपासणी केली जाते. मात्र, सर्व दवाखाने उघडल्यास पेशंटची गर्दी होईल. अनेक रु ग्ण रुक्तदाब किंवा मशीनने शुगर तपासणीसाठीही येतील. अशा परिस्थितीत छोटया दवाखान्यात किंवा नर्सिंग होममध्ये सहा फूट अंतर ठेवत सोशल डिस्टसिंग कसे पाळणार, असा प्रश्न डॉक्टरांचा आहे. छोटी रुग्णालये आणि ओपीडीमधील परिचारिका, मदतनीसांसह अनेक कर्मचारी लॉकडाऊनमुळे घरी आहेत. त्यामुळे रु ग्णालये उघडण्याची सक्ती अन्यायकारक आहे. अनेक डॉक्टरांकडे मास्क व सॅनिटायझर्सही उपलब्ध नाहीत, अशाही तक्रारी या डॉक्टरांनी केल्या आहेत.कोरोनाच्या दहापैकी नऊ रु ग्णांना सुरु वातीला लक्षणे जाणवत नाहीत. असा एखादा रु ग्ण नर्सिंग होम किंवा दवाखान्यात आढळल्यास संपूर्ण वॉर्डमधील रु ग्ण आणि नातेवाईकांना संसर्ग होण्याचीही भीती डॉक्टरांकडून व्यक्त केली जात आहे.जे. जे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाची ओपीडी बंद, मग आमच्यावर सक्ती का?मुंबईतील सर जे. जे. रु ग्णालयात ह्रदयचिकित्सा, ईएनटी ओपीडीचे काही विभाग बंद केले आहेत. ठाणे महापालिकेच्याच छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ओपीडी पूर्णपणे बंद आहे. रुग्णांची थेट तपासणी केली जाते. राज्य सरकार आणि महापालिकेलाही संपूर्ण क्षमतेने दवाखाना सुरू करण्यास अडचणी आहेत. अशा परिस्थितीत छोटया रुग्णालयांवर होणारी सक्ती अन्यायकारक आहे, असा मुद्दा ठाण्यातील डॉक्टरांनी मांडला. यासंदर्भात राजस्थानमधील भीलवाडा येथे झालेल्या घटनेकडे डॉक्टरांकडून लक्ष वेधले जात आहे. तेथील दवाखान्यात तीन डॉक्टर आणि तीन कंपाउंडर कोरोना बाधित आढळले होते. तर अन्य दहा निगेटिव्ह आढळले होते. मात्र, या संदर्भात महापालिकेकडून होणा-या कारवाईच्या भीतीने कोणीही पुढे येऊन बोलण्यास तयार नाही.दरम्यान, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या ठाणे शाखेच्या काही पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त विजय सिंघल यांची भेट घेतली. त्या वेळी झालेल्या चर्चेत ठाणे शहरातील ३० डॉक्टरांची टेलिफोन आणि व्हॉटसअ‍ॅपद्वारे सल्ला देण्यासाठी एक समिती स्थापन करण्याबाबत चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेHealthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या