अनिकेत घमंडी
डोंबिवली: महापालिका हद्दीत 12 जुले पर्यन्त लॉकडाऊन घेण्यात आला असला तरी पोटाची खळगी भरण्यासाठी आता घरी बसवत नाही, कुटुंबातील सदस्यांची चिंता बघवत नही असे सांगत काही रिक्षा चालक रस्त्यावर उतरले असून त्यांनी त्यांची वाहने स्टेशन परिसरात आणली आहेत.
मार्च महिन्यापासून सातत्याने लॉकडाऊन असून चार महिने झाले हाताला काम नाही, घरखर्च कसा भागवगचा असे सांगत रिक्षाचालकांनी चिंता व्यक्त केली. सातत्याने कौटुंबिक गाऱ्हाणे कोणाकडे मांडायचे? पहिल्या, दुसर्या महिन्यात काहींनी अन्नधान्य दिले पण आता ते बंद झालं आहे, घरात पाच डोकी असताना धान्य कसे पुरणार असा सवाल रिक्षा चालकांनी केला. शासनाने ठोस निर्णय घेऊन हाताला काम द्यावे अन्यथा आगामी काळ आमच्यासाठी कठीण असेल असेही ते म्हणाले. आम्हला माहिती आहे की धंदा होणार नाही, पण आशावाद कायम असून तो।कसा सोडायचा, त्यात वाहने चार महिने बंद असतील तर त्याच्या देखभालीचा खर्च आहेच, त्याकडे कोण बघणार असा सवाल करत त्यानी नाराजी व्यक्त केली. आता घरी बसवत नाय, पर्याय नाही रिक्षा चालवणे आणि जो निधी।मिळेल त्यातून दिवस काढणे ही गरज असल्याचे ते म्हणाले.