ठाणे : वास्तविक पाहता पालिका अधिकारीच स्टेशन ते जांभळी नाका मार्गावर एक हजाराहून अधिक फेरीवाले असल्याचे सांगतात. मुंब्य्रात पाच ते सात हजार फेरीवाले असल्याचे सांगितले जाते. केवळ मुंब्य्राचाच विचार केला तर किमान पाच हजार फेरीवाले धरले तरी त्यातूनच पालिकेला वार्षिक ३ कोटी ६० लाखांचे उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. हाच आधार धरून नऊ प्रभाग समित्यांचे उत्पन्न १० ते १५ कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु प्रत्यक्ष किती फेरीवाल्यांकडून किती वसुली झाली, याचा हिशेबच यातून लागत नसल्याने पालिका आकडेवारी लपवित असल्याचा आरोप महापौरांनी केला. पालिकेने जो ठेकेदार नियुक्त केला आहे, त्याच्या माध्यमातून पालिकेची कोट्यवधींची फसवणूक झाल्याचा दावाही यावेळी महापौरांनी केला.
असा सुरू आहे ताबा पावतीत घोटाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2021 4:48 AM