शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

जोरदार पाऊस होऊनही कल्याणमध्ये टंचाई कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 11:52 PM

सदस्यांचा सवाल; स्थायी समितीच्या सभेत मुद्दा गाजला

कल्याण : यंदा जोरदार पाऊस होऊनही कल्याण शहराला मुबलक पाणीपुरवठा केला जात नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी टंचाई जाणवत असून त्याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल गुरुवारी स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी केला.शिवसेना सदस्या माधुरी काळे म्हणाल्या की, माझ्या प्रभागात पाणीपुरवठा केला जात नाही. त्यामुळे काही नागरिकांनी संतप्त होऊन सोशल मीडियावर पाणीटंचाईचे व्हिडीओ टाकले आहे. ते माझ्याविरोधात आहेत. पाणीटंचाईमुळे आम्हाला नागरिकांना तोंड द्यावे लागते. त्याचे खरे कारण अधिकारी सांगत नाहीत.भाजपा सदस्य मनोज राय म्हणाले, कैलासनगर व आमराई या भागात पाणी येत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे. शिवसेना सदस्या छाया वाघमारे यांनीही त्यांच्या प्रभागात पाण्याची समस्या भेडसावत असल्याचे सांगितले. अर्जुन भोईर यांनीही त्याला दुजोरा दिला. ते म्हणाले, यंदा पाऊस जोरदार पडला असतानाही विविध प्रभागांतील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. महापालिकेचे अधिकारी करतात काय? उद्या शुक्रवारी पुन्हा शटडाउन घेतले आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही कमी दाबाने पाणीपुरवठा होतो, याकडेही सदस्यांनी लक्ष वेधले. सदस्या रूपाली म्हात्रे व अपक्ष सदस्य कुणाल पाटील म्हणाले, ग्रामीण भागात पाणीपुरवठा बाधित झाला आहे. उन्हाळा संपल्यावर पावसाळ्यात तरी पाणी योग्य दाबाने पुरवले जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली आहे.पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक म्हणाले, मोहने बंधाºयाला १८ वर्षे पूर्ण झाली आहे. या बंधाºयाची देखभाल दुरुस्ती केलेली नव्हती. त्यामुळे शहराच्या पूर्व व पश्चिम भागात पाण्याची समस्या उद्भवली होती. आता देखभाल दुरुस्तीची निविदा काढली आहे. हे काम सुरू केले असून ते चार महिन्यांत पूर्ण केले जाणार आहे. पावसाळ्यात पाणी पुरेसे असले, तरी वीजपुरवठा सातत्याने खंडित झाला. त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर झाला. याबाबत ‘महावितरण’शी नुकतीच एक बैठक झाली आहे.जोरदार पावसामुळे मोहिली जलशुद्धीकरणात पाणी शिरले. त्यामुळे तेथील पंप बंद होते. त्यामुळेही मधल्या काळात पाणीपुरवठ्यावर त्याचा परिमाण झाला. २७ गावांत वितरण व्यवस्थेची काही कामे हाती घेण्यात आली आहे.प्रसाधनगृहांची होणार दुरुस्ती७७ प्रभागांतील प्रसाधनगृहांच्या देखभाल दुरुस्तीचे प्रस्ताव मागील बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. त्याची सविस्तर माहिती अधिकारीवर्गाकडे नसल्याने हे प्रस्ताव स्थगित ठेवले होते. संपूर्ण माहितीनिशी कार्यकारी अभियंता चंद्रकांत कोलते यांनी हे प्रस्ताव गुरुवारी सभेत मंजुरीसाठी ठेवले असता त्याला मंजुरी देण्यात आली. अन्य ४५ प्रभागांतील प्रसाधनगृहांच्या दुरुस्तीचेही प्रस्ताव घेण्याचा मुद्दा सदस्यांनी उपस्थित केला. परंतु, ७७ प्रभागांतील दुरुस्तीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले.

टॅग्स :Waterपाणीwater scarcityपाणी टंचाईkalyanकल्याण