WhatsApp ने नवीन प्रोटेक्ट आयपी एड्रेस इन कॉल हे फीचर आणलं आहे. हे फीचर आल्यानंतर कोणीही तुमचं लोकेशन ट्रॅक करू शकणार नाही. सध्या कॉलरचं लोकेशन IP एड्रेसद्वारे शोधलं जाऊ शकतं. पण आता कॉलिंग दरम्यान लोकेशनची माहिती मिळणार नाही. हे एक एक्स्ट्रा लेयर सिक्योरिटी फीचर आहे, जे मेसेजिंग किंवा कॉल रिसीव करताना एक्टिव्ह होतं. अशा परिस्थितीत, लवकरच युजर्सना एक नवीन फीचर मिळेल, जे युजर्सना त्यांचा IP एड्रेस लपवण्यास मदत करेल.
मेटा इंजीनिअरच्या मते, नवीन फीचर कॉलिंग दरम्यान आयपी एड्रेस प्रोटेक्ट करेल. यासाठी तुम्हाला सेटिंग्ज बदलावी लागतील. इतर कॉलिंग फीचरप्रमाणे, WhatsApp द्वारे पीयर टू पीयर कनेक्टिव्हिटी ऑफर केली जाते. म्हणजे कॉल करणारे दोन्ही पक्ष एकमेकांचा IP एड्रेस पाहू शकतात. एखाद्याचा कॉलिंग आयपी एड्रेस आणि इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरची माहिती मिळवून युजरच्या सध्याच्या लोकेशनची माहिती मिळवता येते. अशा परिस्थितीत युजरने आयपी एड्रेस आणि इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरची माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करू नये.
IP एड्रेस असा करा हाइड
- सर्वप्रथम तुम्हाला WhatsApp चं लेटेस्ट व्हर्जन डाउनलोड करावं लागेल.- यासाठी ऐप स्टोअर किंवा गुगल प्ले स्टोअरचा वापर करता येईल.- यानंतर तुम्हाला WhatsApp सेटिंग्ज मेन्यू ओपन करावा लागेल.- प्रायव्हसी ऑप्शनवर टॅप करावं लागेल.- नंतर पेज खाली स्क्रोल करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला Advanced ऑप्शनवर टॅप करावे लागेल.- प्रोटेक्ट आयपी एड्रेसवर टॅप करावं लागेल.- यानंतर नवीन प्रायव्हसी फीचर इनेबल केलं जाऊ शकतं.