अंबरनाथ शहरातून अंबरनाथरेल्वे स्थानकाच्या पश्चिम भागात असलेल्या एका बंद केमिकल कंपनीच्या वेस्टेज केमिकल ला भीषण आग लागली आहे. बोरॅक्स केमिकल ही कंपनी अंबरनाथ शहराच्या पश्चिम भागात आहे ही कंपनी सध्या बंद आहे. मात्र तिथला वेस्टेज केमिकल हे बाहेर पडून होतं तिथेच आज दुपारच्या सुमारास भीषण आग लागली.
या आगीपासून अवघ्या दहा ते पंधरा फुटांच्या अंतरावर रेल्वे ट्रॅक आहेत आणि तिथेच एक रेल्वेगाडी देखील उभी आहे. त्यामुळे आगीचा त्या रेल्वेगाडीला देखील धोका निर्माण झाला होता, बोरॅक्स केमिकल या कंपनीच्या बाहेर पडलेलं वेस्टेज केमिकल आज दुपारच्या सुमारास अचानक पेटला आणि क्षणार्धात आगीने रौद्र रूप धारण केले. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी आल्या होत्या, दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले.