शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
2
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
3
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
4
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
5
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
6
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
7
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
9
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
10
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
11
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
12
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
13
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
15
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
16
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
17
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
19
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
20
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी

जागा मिळवण्यावरून फेरीवाल्यांमध्येच जुंपली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2018 2:13 AM

केडीएमसीच्या कारवाईअभावी डोंबिवली रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाल्यांचे अतिक्रमण कायम असताना दुसरीकडे जागा मिळवण्यावरून फेरीवाल्यांमध्ये हाणामारीच्या घटना सर्रास घडत आहेत.

डोंबिवली : केडीएमसीच्या कारवाईअभावी डोंबिवली रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाल्यांचे अतिक्रमण कायम असताना दुसरीकडे जागा मिळवण्यावरून फेरीवाल्यांमध्ये हाणामारीच्या घटना सर्रास घडत आहेत. सोमवारी दुपारी ४ च्या सुमारास येथील इंदिरा चौकात फेरीवाल्यांमध्ये जुंपल्याचे पाहावयास मिळाले. या हाणामारीमध्ये पुरुषांसह एका महिलेचाही समावेश होता.उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रेल्वेस्थानक परिसरातील १५० मीटरपर्यंत व्यवसाय करण्यास फेरीवाल्यांना मनाई आहे. परंतु, डोंबिवली पूर्वेतील स्थानक परिसर याला अपवाद ठरला आहे. केडीएमसीच्या कुचकामी ठरलेल्या फेरीवालाविरोधी पथकामुळे मनाई क्षेत्रात बिनदिक्कतपणे फेरीवाल्यांकडून व्यवसाय थाटले जात आहेत. अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या हप्तेखोरीमुळे या फेरीवाल्यांना पुरते अभय मिळाले आहे. त्यात शहराबाहेरच्या गुंडांच्या आश्रयाने व्यवसाय जोमात सुरू असताना फेरीवाल्यांमध्ये हाणामारीचे प्रसंग सातत्याने घडत आहेत. याआधी पूर्वेकडील स्थानकालगतच्या गल्ल्यांमध्ये फेरीवाल्यांमध्ये आपापसात प्राणघातक हल्लेही झाले आहेत. रामनगर पोलिसांनी या घटना गांभीर्याने घेतल्या नसल्याने हाणामारीचे प्रसंग सुरूच असल्याचे सोमवारी पुन्हा दिसून आले. दुपारी ४ च्या सुमारास जागा मिळवण्यावरून तिघांमध्ये जोरदार मारामारी झाली. यात एक महिलाही होती.महासभेत वेळोवेळी अशा गुंड प्रवृत्तीच्या फेरीवाल्यांबाबत चर्चा होऊन वाढत्या अतिक्रमणाबाबत ठोस कारवाईचे आदेशही देण्यात आले आहेत. कर्तव्यात कसूर करणाºयांचे निलंबन करा, असे ठरावही मंजूर झाले आहेत. पण, परिस्थितीत फरक पडलेला नाही.आयुक्त दखलघेणार का?आयुक्त गोविंद बोडके यांनी २५ एप्रिलला डोंबिवली शहराचा दौरा केला होता. त्यावेळी स्थानक परिसरातील फेरीवाल्यांना व्यवसाय न करण्याचे ‘फर्मान’ काढण्यात आले होते. परंतु, आयुक्तांची मोटार डोंबिवलीहून कल्याणकडे रवाना होताच फेरीवाले पुन्हा दाखल झाल्याचे दिसले होते. डोंबिवलीत फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाबाबत हालचाली प्रशासनाने सुरू केल्या असल्या तरी सध्या सुरू असलेल्या अतिक्रमणाची आयुक्त बोडके गांभीर्याने दखल घेतील का, असा सवाल नागरिक विचारत आहेत.