ठाणे: पहिल्याच दिवशी चालू वर्षातील शाळेतील फी न भरल्यामुळे महागिरी येथील पोलीस शाळेत शिकणाऱ्या शंभर मुलांना त्यांच्या पालकांना कल्पना न देता वर्गाबाहेर काढण्यात आले, अशी शंभर मुले बाहेर काढण्यात आली. यात पोलिसांबरोबर इतर सर्वसामान्य नागरिकांची देखील मुलं आहेत.
शाळेचे एक ॲप आहे आणि त्या ॲपवर 12 तारखेपर्यंत फी भरू शकता असे नमूद करण्यात आले आहे. परंतु असे नमूद केले असताना देखील आज शाळेचा पहिला दिवस आहे आणि आजच फी आणायला हवी होती असा धोशा लावणाऱ्या पोलीस शाळा प्रशासनाने शंभर मुलांना वर्गाच्या बाहेर शाळेतील ग्राउंड वर बसवून ठेवले.
पोलीस नाईक म्हणून काम करणाऱ्या लक्ष्मी क्षीरसागर म्हणाल्या की, "माझ्या मुलाला मी सात वाजता शाळेत पाठवले असते. आठ वाजता समजले की त्याला वर्गाबाहेर बसवून ठेवले. फी आम्ही वेळेतच भरतो. मी आता शाळेमध्ये चेक देखील घेऊन आली आहे परंतु शाळा प्रशासन, तेथील मुख्याध्यापक आम्हाला पालकांना दाद देत नाही. पोलिसांनी ड्युटी करायची का या प्रश्नाकडे बघत राहायचं. पोलिसांच्या मुलांना शिक्षणाचा अधिकार नाही का?"असा प्रश्न त्यांनी केला.
पूनम कडव म्हणाल्या, एका मुलीने तिच्या घरी फी भरली नाही म्हणून आम्हाला बाहेर बसवला आहे असे तिच्या आईला कळवल्यानंतर तिच्या आईने मला कळवलं त्यावेळी मला समजलं माझ्या मुलाला बाहेर काढलेला आहे मी जनरल कॅटेगिरी मध्ये येते माझा पगार दहा तारखेला होतो त्यामुळे मी संध्याकाळी फी भरेल असे मी ठरवले असताना देखील आणि ॲपवर 12 तारखेची मुदत दिलेली असताना देखील त्यांनी माझ्या मुलाला बाहेर बसवलं मुलांच्या मनावरती काय परिणाम होणार अर्धी मुले शाळेत शिकत आहेत आणि अर्ध्या मुलांना वर्गाच्या बाहेर बसवण्यात आले आहेत.
याचबरोबर, आम्ही मीडियाशी बोलो म्हणून उद्या आम्हाला भविष्यात त्रास होण्याची शक्यता आहे. उद्या आमच्या मुलांवर खुन्नस देखील काढली जाईल असेही या पालकांनी सांगितले आहे.
वैभवी बांदेकर म्हणाल्या की, मी तर फी देखील भरली असताना देखील माझ्या मुलाला बाहेर बसवलं. आता मुलांना आमच्या ताब्यात देखील देत नाहीये. एका पालकांनी व्हिडिओ काढला म्हणून मुलांना एका रूममध्ये बसवण्यात आला आहे परंतु त्यांना वर्गात शिकण्यासाठी देत नाहीये. असा मनमानी कारभार पोलीस स्कूल प्रशासनाचा चालू आहे असा आरोप पालकांनी केला आहे.