मुंब्रा : लॉकडाउन वाढवल्यामुळे हवालदील झालेले उत्तर प्रदेश, बिहार आदी राज्यांतील शेकडो बिगारी कामगार मूळ गावी जाण्याची व्यवस्था करण्यात यावी, या मागणीसाठी मंगळवारी दुपारी मुंब्य्रातील कौसा भागातील रशिद कम्पाउंड परिसरातील हाशमत पार्कजवळ रस्त्यावर उतरले होते. पोलिसांनी बळाचा वापर करु न त्यांना पांगवले.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन ३ मेपर्यंत वाढवण्याची घोषणा मंगळवारी पंतप्रधानांनी केली. त्यामुळे लॉकडाउन संपताच १५ तारखेनंतर मूळ गावी जाण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या हजारो कामगारांची, तसेच विविध व्यवसाय करून उपजिविका करत असलेल्यांच्या पायाखालची वाळू सरकली.लॉकडाउन वाढवल्याचे कळताच काम नसल्यामुळे उपासमारीमुळे त्रस्त झालेल्या विविध क्षेत्रातील कामगारांनी कसेही करुन गावी जाण्याचा निर्धार करत, त्यासाठी ते रस्त्यावर उतरले होते. काहींनी इथे उपाशी मरण्यापेक्षा गावी जाऊन कुटुंबासोबत मरणे आम्ही पसंत करु, असे सांगितले.गावी जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था झाली नाही, तर आम्ही चालत जाऊ. चालताना आम्हाला मरण आले तरी चालेल.पण आम्ही आता येथे राहणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.महिलांचीही मागणीमागील काही दिवसांपासून बंद असलेल्या भाजीविक्रीच्या व्यवसायामुळे हवालदिल झालेल्या काही महिलांनीदेखील रेल्वे स्थानकासमोरील रस्त्यावर उतरु न आमची गावी जाण्याची व्यवस्था करा, अशी मागणी केली.