ठाणे : मागील ९ महिन्यांपासून केलेल्या कामाचा मोबादलाला ठाण्यातील तीन हात नाका येथील सुपर मॅक्स कंपनीच्या कामगारांना मिळालेला नाही. तसेच कंपनी नफ्यात असताना कंपनीच्या २ हजार कामगारांना देशधडीला लावण्याचे काम कंपनी करत असल्याचा आरोप करत न्याय मिळावा, यासाठी अचानक कंपनीचे शेकडो कामगार सोमवारी रस्त्यावर उतरले आहेत. या कामगारांनी ठाण्यातील तीन हात नाका येथील रस्ता रोखून चक्काजाम केला. दरम्यान त्याचे रूपांतर लॉंग मार्चमध्ये झाले. कामगारांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर लॉंग मार्च काढण्यात आला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी भेट घेत त्यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री आणि कंपनी व्यवस्थापकांशी एक बैठक आयोजित करण्याची मागणी केल्याचे कामगारांनी बोलताना सांगितले.
सोमवारी अचानक सकाळी सुपर मॅक्स कंपनीचे शेकडो कामगार रस्त्यावर उतरले. आणि रस्त्यावर बसून रस्ता चक्काजाम करताना मुख्यमंत्री न्याय दया... न्याय दया... कामगार एकजुतीचा विजय असो... अशा घोषणा देत होते. यावेळी बोलताना, काही कामगारांने आम्ही मुख्यमंत्री पक्षाचे माणसे असताना ही आम्हाला ९ महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. यासंदर्भात कामगारांनी कामगार, उद्योग मंत्री यांच्यासह मुख्यमंत्री यांनाही निवेदन दिले आहे. तरी आम्हाला न्याय मिळत नसल्याने नाईलाजास्तव आम्हाला रस्त्यावर उतरावे लागले आहे. तसेच मुख्यमंत्री आणि कंपनी व्यवस्थापक यांच्याशी बैठक व्हावी, हे आंदोलन केले आहे.
दरम्यान ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर लॉंग मार्च काढण्यात आला असून तेथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत, मुख्यमंत्री आणि कंपनीच्या लोकांशी भेट घालून द्या तसेच आम्हाला न्याय दया अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहोत. यावेळी पुरुष कामगारांसह महिला कामगार ही तितक्याच प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. यावेळी ठाणे शहर पोलिसांनी कामगारांना समजविण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र ते आपल्या मागण्यांवर ठाम राहत,लॉंग मार्च काढला.