शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

उल्हासनगरात त्रिशंकू अवस्था

By admin | Published: February 24, 2017 5:58 AM

महापालिकेची सत्ता प्राप्त करण्याकरिता कुख्यात पप्पू कलानी यांचे पुत्र ओमी कलानी यांच्यासोबत

उल्हासनगर : महापालिकेची सत्ता प्राप्त करण्याकरिता कुख्यात पप्पू कलानी यांचे पुत्र ओमी कलानी यांच्यासोबत आघाडी करणाऱ्या भाजपाला ३३ जागांवर मजल मारता आली असली, तरी शिवसेनेचे २५ नगरसेवक निवडून आल्याने आणि साई पक्षाला ११ जागा मिळाल्याने, उल्हासनगरात त्रिशंकू अवस्था निर्माण होऊन सत्ता स्थापनेची रस्सीखेच सुुरू झाली आहे.राष्ट्रवादीचे बहुतांश नगरसेवक ओमी टीममध्ये सामील होऊन भाजपासोबत गेल्यानंतर, भरत गंगोत्री यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला ४ जागांवर यश मिळाले. कुठल्याही पक्षाला किंवा आघाडीला स्पष्ट बहुमत नसल्याने साई पक्षाच्या हाती पुन्हा सत्तेची चावी गेली आहे. उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपाने ओमी कलानी यांच्यासोबत आघाडी केली, तसेच मतांचे ध्रुवीकरण करण्याकरिता सिंधी व मराठी मुद्द्यावर निवडणूक लढली गेली. प्रभाग क्र.१७ चा सर्वप्रथम निकाल जाहीर झाला. राष्ट्रवादीचे भरत गंगोत्री, सुनीता बगाडे, सतरामदास जेसवानी, पूजाकौर लबाना विजयी झाले. या निकालाने सर्वाधिक धक्का ओमी व भाजपाला बसला. प्रभाग क्र. १ शहाड गावठाण या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातून एकमेव ज्योती गायकवाड या विजयी झाल्या असून, त्यांनी भाजपाचे दिग्गज राम चार्ली यांचा पराभव केला. मात्र, इतर तीन जागी भाजपाचे उमेदवार विजयी झाले. शिवसेनेने मराठा सेक्शन, संतोषनगर-महादेवनगर, संभाजी चौक-लालचक्की, चोपडा कोर्ट हे आपले बालेकिल्ले राखण्यात यश मिळवले. प्रभाग क्र. २० मधून आकाश व विकास पाटील, तर प्रभाग क्र.-३ मधून ४ पैकी भुल्लर दाम्पत्य फेरमतमोजणीत निवडून आले. प्रभाग क्र.१९ शिवसेनेचा बालेकिल्ला होता. मात्र, ऐन वेळी मीना सोंडे, विजय पाटील व किशोर वनवारी यांनी शिवबंधन तोडून काही तासांत भाजपात प्रवेश केला. या प्रकाराने सेनेला धक्का बसून वेळेअभावी शिवसेनेला चारही जागी उमेदवार उभे करता आले नाही. परिणामी, सोंडेसह चारही जण निवडून आले. भारिपच्या कविता बागुल व शिवसेनेच्या सविता दिवटे यांना समसमान मते पडली. निवडणूक अधिकारी व पालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी चिठ्ठी काढून बागुल यांना विजयी घोषित केले. २०१२ च्या निवडणुकीत सुभाष टेकडीमधून बीएसपीचे दोन नगरसेवक निवडून आले होते, तर मनसेचा एक व ६ अपक्ष नगरसेवक विजयी झाले होते, तसेच काँग्रेसचे ८ नगरसेवक निवडून आले होते. मनसे, बीएसपी व अपक्षांचा या निवडणुकीत धुव्वा उडाला असून, काँग्रेसच्या एकमेव अंजली साळवे निवडून आल्या आहेत. प्रभाग क्र.१७ मध्येच काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादीची लढत होती. त्यात राष्ट्रवादीची सरशी झाल्याने काँग्रेसच्या दिग्गज जया साधवानी, मोहन साधवानी यांचा पराभव झाला, तर भरत गंगोत्री व सतरामदास जेसवानी, सुनीता बगाडे, पूजाकौर लबाना यांचा विजय झाला आहे. दिग्गजांचा पराभव भाजपाचे राम चार्ली, आकाश चक्रवर्ती, प्रवीण कृष्णानी, काँग्रेसच्या जया साधवानी, शिवसेनेचे विनोद ठाकूर, विजय ठाकूर शिवसेनेचे बंडखोर सुभाष मनसुलकर, माजी महापौर आशा इदनानी, राष्ट्रवादीचे गटनेते व ओमी टीमचे प्रमुख सदस्य मनोज लासी, माजी महापौर मालती करोतिया, विद्या निर्मले, यशस्वी निर्मले यांचा पराभव झाला, तर साई पक्षाच्या अजित गुप्ता या नवख्या उमेदवाराने मनोज लासी यांचा पराभव करून ते जायंट किलर ठरले.घराणेशाहीचा विजय शिवसेनेतील घराणेशाहीने दणदणीत विजय मिळवला आहे. प्रभाग क्र. ३ मधून राजेंद्रसिंग भुल्लर, चरणजित कौर भुल्लर, प्रभाग क्र. १० राजेंद्र चौधरी, राजश्री चौधरी, प्रभाग क्र,-१५ मधून धनंजय बोडारे, बसुधा बोडारे अशी तीन दाम्पत्ये निवडून आली. धनंजय बोडारे यांच्या वहिनी शीतल बोडारे याही प्रभाग क्र-१५ मधून विजयी झाल्या आहेत, तर प्रभाग क्र.२० मधून आकाश व विकास पाटील हे सख्खे भाऊ, तसेच प्रभाग क्र.१० व ४ मधून पुष्पा बागुल व स्वप्निल बागुल हे मायलेक निवडून आले. स्वप्निल बागुल अवघे २२ वर्षांचे आहेत. दिव्यात भाजपा, मनसेला फटका दिव्यातील लोकवस्ती गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढल्याने तेथील वॉर्डांची संख्या दोनवरून वाढून ११ झाली होती. दिव्यातील मतदारांनी मनसे व भाजपाला नाकारले. तेथे शिवसेनेला ८, तर राष्ट्रवादी काँग्रेसला ३ जागा मिळाल्या.पंचम कलानी विजयी पंचम कलानी प्रभाग क्र.२ मधून विजयी झाल्या. त्यांच्या वॉर्डात ‘नोटा’ला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. भाजपाचे जमनुदास पुरस्वानी, हरेश जग्यासी, मीना कौर लबाना हे विजयी झाले.