ठाणे : कल्याण तालुक्यातील म्हारळगांव येथील अनुसुचित जाती व नवबौध्द वस्तीचा विकासाकडे दुर्लक्ष, तसेच इंदीरानगर दलित वस्ती रस्त्याच्या कामात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी संबंधीत अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यास विलंब, समाज कल्याण समितीमध्ये अनुसुचित जातीचे सभासद जाणीवपूर्वक घेतले नसल्याचा आरोप आदींच्या विरोधात ठाणेजिल्हा परिषदेच्या सदस्या वृषाली शेवाळे यांनी २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनी म्हारळगांव येथील संबंधीत रस्त्यावर पोषण करण्याचे निश्चित केले आहे. प्रशासनाकडून होत असलेली मनमानी व कारवाईच्या विलंबास अनुसरून शेवाळे यांनी उपोषणाचा इशारा आधीच दिला. त्यास अनुसरून समाजकल्याण विभागाने लेखी देऊन कारवाई केल्याचे त्यात नमुद केले. पण समाधानकारक कारवाई न झाल्यामुळे त्यांनी उपोषणास बसण्याचे निश्चित केल्याचे त्यांचे पती विलास शेवाळे यांनी सांगिते. पण प्रशासनाकडून समाधानकारक कारवाई होत नसल्यामुळे व समाज कल्याण समितीमध्ये अनुसुचित जातीचे सभासद जाणीवपूर्वक घेतले नसल्याच्या आरोपाखाली संबंधीत सचिवांवर अॅट्रोसिटीच्या गुन्हा नोंदवण्याची मागणी वृषाली शेवाळे यांनी लावून धरली आहे. तसे निवेदन त्यांनी कोकण विभागीय आयुक्त व ठाणे जिल्हाधिकारी यांना देखील आधीच दिले आहे.दलित वस्तीशेष फंडातून म्हारळ दलीत वस्तीसाठी ८५ लाखांचा निधी मंजूर झाला होता. त्यातील इंदिरा नगर या दलीत वस्तीच्या रस्त्यावर दहा लाख रूपये खर्चही झाले. पण तो रस्ताच अस्थित्वात नसल्याचे लेखी निवेदन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुषा जाधव यांच्याकडे देखील दिलेले आहे. मात्र त्यास अनुसरून अद्यापही ठोस कारवाई झाली नसल्याचे आरोपाखाली त्यांनी प्रजासत्ताक दिनी उपोषणाचे निश्चित केले. साधी दखलीही घेतली नसल्यामुळे संतापलेल्या शेवाळे ह्यांनी उपोषणाचा मार्ग आवलंबला आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधार सभेत ही या विषयांवर चर्चा झाली. यावेळी चौकशी करून कारवाई करू असे आश्वासन अध्यक्षा व मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी दिले .यानुसार मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी पहाणी करु न गटविकास अधिकारी यांना दोन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, ज्या रस्त्याचे कामकाज केले तो रस्ताच अस्थित्वात नाही. तरीदेखील त्याच्या कामाचे बील अदा करण्यात आले आहे. या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याची, तसेच म्हारळ येथील इंदिरा नगर दलितवस्ती क्र . ३ मधील रस्ता नादुरु स्त व रहदारीस योग्य नसल्याने सदर रस्ता कॉंक्र ीटीकरणासाठी निधी तात्काळ मंजुर व्हावा आदी मागण्यांच्या पुर्ततेसाठी वृषाली शेवाळे यांनी प्रजासत्ताक दिनी उपोषण करण्याचा मार्ग आवलंबला आहे.
प्रजासत्ताक दिनी ठाणे जिल्हा परिषद प्रशासनाच्या मनमानी विरोधात महिला सदस्याचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 7:59 PM
प्रशासनाकडून होत असलेली मनमानी व कारवाईच्या विलंबास अनुसरून शेवाळे यांनी उपोषणाचा इशारा आधीच दिला. त्यास अनुसरून समाजकल्याण विभागाने लेखी देऊन कारवाई केल्याचे त्यात नमुद केले. पण समाधानकारक कारवाई न झाल्यामुळे त्यांनी उपोषणास बसण्याचे निश्चित केल्याचे त्यांचे पती विलास शेवाळे यांनी सांगिते. पण प्रशासनाकडून समाधानकारक कारवाई होत नसल्यामुळे व समाज कल्याण समितीमध्ये अनुसुचित जातीचे सभासद जाणीवपूर्वक घेतले नसल्याच्या आरोपाखाली संबंधीत सचिवांवर अॅट्रोसिटीच्या गुन्हा नोंदवण्याची मागणी वृषाली शेवाळे यांनी लावून धरली
ठळक मुद्देम्हारळगांव येथील अनुसुचित जाती व नवबौध्द वस्तीचा विकासाकडे दुर्लक्ष समाज कल्याण समितीमध्ये अनुसुचित जातीचे सभासद जाणीवपूर्वक घेतले नसल्याचा आरोप समाधानकारक कारवाई न झाल्यामुळे त्यांनी उपोषणास बसण्याचे निश्चित