लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: दारुच्या नशेत पत्नीशी झालेल्या वादातून वसंतविहार येथील विवेक विकास खरात (३२, रा. विवेकानंद नगर, ठाणे) या पतीने खाडीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघड झाली. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.दारुचे व्यसन असलेला विवेक गेली काही दिवस आर्थिक विवंचनेत होता. यातूनच त्याचा ५ नोव्हेंबर रोजी पत्नीशी कौटुंबिक कारणातून वाद झाला होता. या वादानंतर त्याने पत्नीला रिक्षातून कोपरी येथील तिच्या माहेरी सोडविले होते. त्यानंतर तो बेपत्ता झाला होता. ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास वाघबीळ रेतीबंदर खाडीजवळ त्याचा मृतदेह आढळून आला. सुरुवातीला त्याची ओळख पटली नव्हती. तो बेपत्ता असल्याबाबतची तक्रार राहूल चव्हाण (२०,रा. पवारनगर, ठाणे) या मावस भावाने चितळसर पोलीस ठाण्यात ५ नोव्हेंबर रोजी दाखल केली होती. ठाणे अग्निशमन दलाच्या मदतीने त्याचा मृतदेह खाडीतून बाहेर काढल्यानंतर राहूल चव्हाण याला पाचारण करुन त्याच्या मृतदेहाची ओळख पटविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत आहे.
ठाण्यात कौटुंबिक वादातून पतीची खाडीमध्ये उडी घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2020 11:43 PM
दारुच्या नशेत पत्नीशी झालेल्या वादातून वसंतविहार येथील विवेक विकास खरात (३२, रा. विवेकानंद नगर, ठाणे) या पतीने खाडीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघड झाली. कौटुंबिक वादानंतर त्याने पत्नीला रिक्षातून कोपरी येथील तिच्या माहेरी सोडविले होते. त्यानंतर तो बेपत्ता झाला होता.
ठळक मुद्देकासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हाभावाने दिली होती बेपत्ता झाल्याची तक्रार