कल्याण - मी डॉक्टर नसलो तरी मी कुणालाही इंजेक्शन देऊ शकतो. डॉक्टर नसले तरी इंजेक्शन देता आले पाहिजे असा गर्भीत इशारा विरोधकांना मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी हसत हसत दिला. या वाक्याला सावरुन घेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले की, तुम्ही इंजेक्शन देऊ नका. नाही तर मुख्यमंत्री म्हणाले कुणालाही इंजेक्शन द्या असा त्याचा अर्थ घेताल, याकडेही लक्ष वेधले. त्यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
कल्याण पश्चिमेतील आर्ट गॅलरीत कल्याण डोंबिवली महापालिकेने उभारलेल्या कोविड रुग्णालयाचे ऑनलाईन लोकार्पण मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते आज सायंकाळी करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या कामाविषयी गौरवोद्गार काढताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी विरोधकांना इंजेक्शन देण्यात येईस असा अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीस भाजपचे खासदार कपील पाटील यांनी मी जरी डॉक्टर नसलो तरी जनतेची कामे करतोच ना. जनतेची कामे करण्यासाठी डॉक्टर असण्याची गरज नाही असा चिमटा काढला होता. मात्र हा चिमटा काढत असताना भिवंडी ग्रामीण भागात कोविड रुग्णालये नव्हते. त्यामुळे हाल झाले. हद्दीचा मुद्दा आड न येता भिवंडीतील कोवीड रुग्णांना कल्याणच्या रुग्णालयात उपचार व्हावेत अशी मागणी केली. त्याचबरोबर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात मी आहे. त्यांनी चांगले काम केले असल्याची कबूली दिली.
खासदार पाटील यांनी चिमटा काढल्याने त्याला उत्तर देताना खासदार शिंदे यांनी कोविड रुग्णालय हे पाटील यांच्या मतदार संघात उभे राहिले आहे. एक चांगले काम झाले आहे. त्यामुळे त्याचा उल्लेख केला गेला पाहिजे. मी काम करीत असताना भेदभाव करीत नाही. याकडे त्यांनी लक्ष वेधले. पालकमंत्री शिंदे यांनी सांगितले की, कोविड काळात काम करीत असताना पालकमंत्री या नात्याने भेदभाव केला नाही. सरकारकडून निधी मंजूर करुन दिला. श्रीकांत डॉक्टर असल्याने त्याला आरोग्याच्या संदर्भातील गोष्टी चांगल्या कळतात. त्यामुळे त्यांनी चांगल्या प्रकारे काम केले असल्याचे नमूद केले.या सगळ्य़ावर कडी करीत मुख्यमंत्र्यांनी उपरोक्त उद्गार काढले.
तसेच कपील पाटील यांनी पालकमंत्र्यांच्या संपर्कात असतो असे म्हटले होते. तोच धागा पकडून असे आमच्या संपर्कात राहा. तूम्हाला आम्ही आमचेच समजतो असेही मुख्यमंत्री पाटील यांना म्हणाले.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी महापौर विनिता राणे यांच्या कामाचा गौरव केला. त्याचबरोबर पालकमंत्र्यांनी इतके पालकत्व घेतले की, त्यांना कोरोना झाला होता. त्यावर त्यांनी मात केली. याकडे लक्ष वेधले.