- कुमार बडदेमुंब्रा : मुंब्य्रातील मित्तल मैदानावर रविवारी रात्री रंगलेल्या मुशायऱ्यामध्ये अपेक्षेप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सीएए, एनआरसी या निर्णयावरून शेरोशायरीच्या माध्यमातून वाक्बाण सोडण्यात आले. ‘दिन के तुम कातिल हो, जम्हुरियत के तुम गुन्हेगार हो, तेरे सरकार को, तेरे दरबार को मै नही मानता’, अशा कडक शब्दांत शायरांनी सरकारवर तोफ डागली.मागील काही दिवसांपासून सीएएविरोधात देशातील अनेक राज्यांत आंदोलने सुरू आहेत. यातील काही आंदोलनांनी हिंसक स्वरूप धारण केल्याने देशातील काही भागांत अराजकसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे २५ डिसेंबरला होणाºया मुशायºयाचा कार्यक्र म स्थगित करण्यात आला होता. देशातील सद्य:स्थितीत या मुशायºयावर बहिष्कार घालण्याचे आवाहन काही मौलवींनी शनिवारी केले होते. त्याला दाद न देता हजारो दर्दी रसिकांनी मुशायºयाला गर्दी करून उत्स्फूर्त दाद दिली. कार्यक्र माला हजर असलेल्या कन्हैयाकुमार याने नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी सरकार चुकीच्या कागदपत्रांची मागणी करीत असल्याचा दावा केला. सीएए, एनआरसी कायदा मागे घेतला नाही, तर तो न मानण्याचे आवाहन केले. व्यासपीठाच्या मध्यभागी उभारण्यात आलेल्या खंदकातून वर आगळ्यावेगळ्या पद्धतीने व्यासपीठावर आगमन झालेल्या गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देशातील १३५ कोटी नागरिकांविरोधात हा कायदा असल्याचे मत व्यक्त केले. १९४७ च्या फाळणीच्या वेळी देशात राहून देशभक्तीचा दाखला देणाºया मुस्लिमांकडे किती वेळा देशभक्तीचा पुरावा मागणार, असा सवाल त्यांनी केंद्र सरकारला केला. संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्यांनी दगडाला दगडाने उत्तर न देता गांधीजींच्या अहिंसेच्या मार्गाने आंदोलनाचे आवाहन त्यांनी केले. इमरान प्रतापगढी यांनी काही मंत्री गुंडांची भाषा बोलत असल्याचे सांगत विद्यमान पंतप्रधानांसारखा खोटारडा पंतप्रधान बघितला नसल्याचा दावा केला. सीएए न मानण्याचे आवाहनही केले. प्रतापगढी म्हणाले की, ‘अरे दिवाने सुनो, और सारे सियासती घरानो सुनो, जो बचा ना सके अपना आवाम को, ऐसे बेबस सभी हुकराम सुनो, सिर्फ मसले नही मजहबी, दिन के तुम कातिल हो, जम्हुरियत के तुम गुन्हेगार हो, तेरे सरकार को, तेरे दरबार को मै नही मानता’, ‘पहले पानी बरसता था, अब खूनही खून बरसता है ’अशीटीका केली.विजय तिवारी यांना ‘सारी दुनिया को मुहब्बत मे मजा आता है, और तुझे खून बहाने मे मजा आता है, जी तो करता है, तेरे हर न्यूज पर कंकर मारु , नफरत करता है, दुनिया का बुरा बनता है, मोहब्बत करने मे तेरा क्या जाता है’, या रचनेमधून विद्यमान परिस्थितीवर मार्मिक भाष्य केले. विविध स्किम राबविणाºया केंद्र सरकारने ‘मिठा बहुत हुआ, नमकीन भी निकालो, नोटबंदी की तरह बीबी बदलने की भी स्कीम निकालो’, या रचनेतून नोटबंदीची खिल्ली उडवली. सबा बलरामापुरी हिने ‘यही पे जीना है, यही पे मरना है, यह आती जाती हुकूमत से क्या डरना है, हमारी बहने जो आज सडको पे उतरी है, उन्हे ये मालूम है किस आगसे गुजरना है, हमे मौत से डराते हो, हमे मालूम है एक दिन तो मरना है’, या रचनेतून सरकारच्या फतव्यांना न घाबरण्याचे आवाहन केले. ‘हमे मौत से डराते हो, हमे मालूम है एक दिन तो मरना है, बढी जतनसे इकठ्ठा हुए है अब न तुटना है न बिखरना है’, या शब्दांमधून आंदोलकांना एकत्र राहण्याचे आवाहन केले. सुमन दुबे यांनी ‘भाई का गला काट रहा है, घर एक दो टुकडो मे बाट रहा है, जिस शाखा पर बैठा है वही छाट रहा है, बाग का मालीही चमन काट रहा है’, या रचनेतून सरकारच्या आत्मघातकी कृत्यावर बोट ठेवले. ‘जात पात के राजनीतीसे दिल्ली जल्दी जागो, नीरव, मल्ल्या देश कैसे भागे, वाह रे चौकीदार तुने कैसे चौकीदारी निभाई, हमसे कागज मागते हो, अपने तो दिखलाओ, खो गई रफेल उसे तो धूद के लाओ, यह कैसा कानून बनाया जरा अर्थव्यवस्था पर भी चर्चा करलो’, या रचनेमधून केंद्रावर हल्ला चढवला. नदीम शाद, अंजुम, नुज्जत अंजुम आदींनीही त्यांच्या रचनांमधून सीएए, एनआरसीवर टीका केली. यावेळी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव सय्यद अली अशरफ, मुंब्रा-कळवा विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शमीम खान, नगरसेवक अशरफ पठाण, ‘संघर्ष’ महिला संघाच्या अध्यक्षा ऋता आव्हाड आदी उपस्थित होते.विरोधी पक्षनेतेपदावर दावा केल्याचा गौप्यस्फोटविद्यमान सरकारमध्ये मंत्री बनण्याआधी काही दिवस अगोदर विरोधी पक्षनेता म्हणून निवड करावी, यासाठी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती, असा गौप्यस्फोट जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केला.
...तेरे सरकार को, तेरे दरबार को मैं नही मानता!; शायरीच्या माध्यमातून सीएएला, एनआरसीला केला कडाडून विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 12:42 AM