शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

मी कुणाच्याही दबावाखाली काम करत नाही - पंकज आशिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2020 12:13 AM

दुजाभावाचा नगरसेवकांनी केला आरोप : भिवंडी पालिकेची झाली महासभा, सदस्यांनी केली टीका

भिवंडी : पालिकेची २५ सप्टेंबरची तहकूब महासभा बुधवारी झाली. यात आयुक्त डॉ. पंकज आशिया हे नगरसेवकांच्या कामाबाबत दुजाभाव करतात, असा आरोप करण्यात आला. आमदार रईस शेख यांच्या कामांना प्राधान्य देतात, अशी टीकाही सदस्यांनी केली. याला उत्तर देताना आयुक्तांनी मी कुणाच्याही दबावाखाली काम करत नाही, असे स्पष्ट केले. माझ्याकडे सध्या २४ विकासकामांच्या फायली आदेशासाठी आल्या आहेत. त्याबाबत आपण अभ्यास करून योग्य त्या विकासकामांना लवकरच मंजुरी देणार असल्याचे सांगितले.

जिलानी इमारत दुर्घटनेनंतर आमदार शेख यांनी केलेल्या टिष्ट्वटनंतर आयुक्तांनी कोणतीही शहानिशा न करता दोन पालिका अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. मात्र, प्रतिनियुक्तीवर आलेल्या सहायक आयुक्त नूतन खाडे यांना निलंबित न करता आयुक्त अशा अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप नगरसेवक निलेश चौधरी यांनी केला. तर, सभागृहनेते विलास पाटील म्हणाले की, आम्हाला शहराचा विकास हवा आहे. त्यासाठी आमदारांनी सरकारकडून निधी न आणता शहरात नगरसेवकांविरोधात ओरड करत आहेत, ते चुकीचे आहे. प्रशासनाने महापौरांचा सन्मान राखलाच पाहिजे. तसे न केल्यास आम्ही कार्यालयास टाळे ठोकण्यास मागे हटणार नाही, असा इशाराही पाटील यांनी दिला. नगरसेवक संतोष शेट्टी यांनी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना तसेच जखमींना तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली.उपमहापौर इम्रान खान यांनी इमारत दुर्घटनेस सय्यद जिलानी जबाबदार नसल्याचे सांगितले. उलट, ते उद्ध्वस्त कुटुंबीयांना आधार देण्याचे काम करीत असताना त्यांच्यावर महापालिका गुन्हे दाखल करते, हे चुकीचे आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी इतर सदस्यांनीही टीका केली.

टॅग्स :bhiwandiभिवंडीthaneठाणे