ठाणे : शिवसेना आणि राष्ट्रवादीची आघाडी व्हावी, असे माझे मत असल्याचे स्पष्ट करून राष्ट्रवादीचा जिल्हा संपर्क प्रमुख मी आहे. त्यामुळे आघाडीबाबत मीच निर्णय घेणार असल्याचे सांगून यापुढे आघाडीबाबत मीच बोलणार. पक्षातील इतर कोणी बोलणार नाही, अशी तंबी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्वपक्षीय नेत्यांना सोमवारी रात्री दिली. पत्रकारांशी बोलतांना त्यांनी आनंद परांजपे यांच्यावर पक्षनिष्ठेवरून टीका करणाऱ्या शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना खडेबोल सुनावले. ठाण्याच्या राजकीय इतिहासात मला कोणी सांगू नये, नारायण राणेंनी कसे कोणाला बाहेर काढले, याचा इतिहास मला माहीत आहे. त्यामुळे पक्षनिष्ठा शिकवायला जाऊ नका, असा टोलाही त्यांनी राष्ट्रवादीवर टीका करणाऱ्या शिवसेनेतील नेत्यांना लगावला.आव्हाड यांना आघाडी व्हावी असे वाटत आहे, गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि राष्ट्रवादीचे स्थानिक पातळीवरील नेतृत्व त्यात मिठाचा खडा टाकण्याचे काम करीत आहेत. याबाबत त्यांनी आघाडी होईलच असे सांगून नजीब मुल्ला यांनी स्बळाची भाषा केली असली तरी त्यांच्याकडून ते वक्तव्य अनावधानाने झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मीच अंतिम निर्णय घेणार; आघाडीत बिघाडी करू पाहणाऱ्या स्वपक्षीय नेत्यांना आव्हाडांची तंबी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 5:29 AM