ठाणे- साहित्यविश्वातील उत्तुंग लेखक आणि कवींचा सन्मान करणारा 'लोकमत साहित्य पुरस्कार' आज ठाण्यात पार पडला. साहित्य अकादमी, ज्ञानपीठ अशा अनेक नामवंत पुरस्कारांनी सन्मानित झालेले ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना त्यांच्या प्रदीर्घ साहित्य सेवेसाठी 'जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आलं. यावेळी आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील आणि साहित्यिक पानिपतकार विश्वास पाटील उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपल्या लेखनासंदर्भात अनुभव सांगितले.
धर्म आणि राष्ट्रीयतेमुळे देशाचं नुकसान, भालचंद्र नेमाडेंचं परखड मत; 'अच्छे दिन' काय तेही सांगितलं!
विश्वास नांगरे पाटील म्हणाले, २०१२ पर्यंत मी फक्त ड्युटीमध्ये होतो. नंतर माझी अँटी करप्शनला बदली झाली, त्यावेळी मला शनिवारी आणि रविवारी वेळ मिळालाचा. यावेळी मी तीन महिन्याची रजा घेऊन पहिलं पुस्तक लिहिलं. आणि कोरोना काळात दुसरं पुस्तक लिहिलं.
'विश्वास पाटील सरांनी जेवढी पुस्तक लिहिली आहेत, तेवढी पुस्तक मी वाचलेली नाही. मी मला पोलीस खात्यात आलेले अनुभव लिहिले आहेत. मी युपीएससी परीक्षेत यश मिळेपर्यंतचा प्रवास 'मन मैं है विश्वास' या पुस्तकात लिहिला. यानंतर पुढचा प्रवास 'कर हर मैदान फतें' या पुस्तकात लिहिला आहे, असंही विश्वास नांगरे पाटील म्हणाले.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनीही लहानपणीच्या आठवणी सांगितल्या. विश्वास पाटील म्हणाले, माझ्या आणि विश्वास नांगरे पाटलांच्या गावात अंतर ४ किलोमीटचे आहे. आम्ही यांच्या गावात शाळेसाठी जात होतो. मी जाताना डेअरीत दूध देण्यासाठी जात होतो. तेव्हा त्या डेअरीचे चेअरमन विश्वास नांगरे पाटलांचे वडिल होते. त्यामुळे आमच्या दोघांचे नाते पाण्यासारखं गोड आहे, अशी आठवण विश्वास पाटील यांनी सांगितली.