प्रा. राजेंद्र चिंचोलेदेशाच्या विकासात जडणघडणीत महत्त्वाचे काम प्रशासकीय अधिकाऱ्यांचे असते. शासनाने घेतलेल्या लोकाभिमुख निर्णयांची अंमलबजावणी करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर असते. यासाठी योग्य सक्षम, बुद्धिमान, प्रामाणिक, निर्णयक्षम, गतिमान, कुशल प्रशासकीय अधिकाºयांची निवड करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून उमेदवारांचे कृषी, उद्योग, वाणिज्य, बुद्धिमत्ता, आकलन तर्कसंगती, सामाजिक, सांस्कृतिक, कला, विज्ञान, तंत्रज्ञान, भाषा, राजकीय, आर्थिक, ऐतिहासिक, भौगोलिक, ज्ञान, चालू घडामोडींवरील ज्ञान, क्षमताधिष्ठित, निर्णयक्षम, प्रशासकीय अधिकारी आदी विभागात राष्ट्रांच्या सर्वांगीण प्रगतीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावीत आहे.भारतातील गतिमान प्रशासन हे जगातील गतिमान प्रशासनापैकी एक आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे दरवर्षी देशातील वेगवेगळ्या सेवांच्या भरतीसाठी वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जातात. त्यात१) भारतीय नागरी सेवा परीक्षा२) भारतीय वनसेवा परीक्षा३) भारतीय अभियांत्रिकी सेवा४) एकत्रित संरक्षण सेवा परीक्षा५) राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी व नाविक अकादमी६) एकत्रित वैद्यकीय सेवा परीक्षा७) सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्स परीक्षा८) भारतीय अर्थ विभाग सेवा /सांख्यिकी सेवा परीक्षा९) एकत्रित भूवैज्ञानिक व भूगर्भशास्त्रज्ञ परीक्षा१०) केंद्रीय राखीव दल विभाग परीक्षा११) असिस्टंट प्रॉव्हिडंट फंड कमिशनर परीक्षांचा समावेश आहे.नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२० ही २१ मे रोजी असून यासाठीची आॅनलाइन नोंदणी १२ फेब्रुवारी २०२० पासून सुरू झाली आहे. आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ : ँ३३स्र२://६६६.४स्र२ूङ्मल्ल’्रल्ली.ल्ल्रू.्रल्लच्अर्ज भरण्याची मुदत : १२ फेब्रुवारी ते ०३ मार्च २०२०च्नागरी सेवा पूर्व परीक्षेतील महाराष्ट्रातील केंद्रे : औरंगाबाद, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नागपूरच्शैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवीच्वयोमर्यादा : १ आॅगस्ट २०२० रोजीच्खुला प्रवर्ग : किमान २१ वर्षे व कमाल३२ वर्षेच्इतर मागास प्रवर्ग : कमाल ३५ वर्षेच्अनुसूचित जाती / जमाती : कमाल ३८ वर्षेच्प्रयत्नांची संख्या : खुला प्रवर्ग ६,इतर मागास ९च्अनुसूचित जाती/जमाती : मर्यादा नाहीच्परीक्षा शुल्क : शंभर रुपयेच्नागरी सेवा पूर्व परीक्षा दिनांक :३१ मे २०२०यूपीएससीद्वारे होणाºया आगामी परीक्षापरीक्षेचे नाव दिनांक१) उकरऋ अउ छऊउए २०२० परीक्षा १ मार्च२) एनडीए अँड एनए १ १९ एप्रिल३) केंद्रीय नागरी सेवा पूर्व परीक्षा ३१ मे४) भारतीय वनसेवा पूर्व परीक्षा ३१ मे५) भारतीय अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २८ जूनपासून६) भारतीय अर्थ सेवा / सांख्यिकी सेवा परीक्षा २६ जून७) एकत्रित भू-वैज्ञानिक व भूगर्भशास्त्रज्ञ परीक्षा २७ जून८) एकत्रित वैद्यकीय सेवा परीक्षा १९ जुलै९) सी.ए.पी.एफ. परीक्षा ९ आॅगस्ट१०) सी.डी.एस. २ परीक्षा ८ नोव्हेंबर११) केंद्रीय नागरी सेवा मुख्य परीक्षा १८ सप्टेंबरपासून१२) एनडीए व एनए २ परीक्षा ६ सप्टेंबर१३) भारतीय वनसेवा मुख्य परीक्षा २२ नोव्हेंबर(लेखक स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शक आहेत)
वाटा करिअरच्या : ओळख केंद्रीय लोकसेवा आयोगाची
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 1:27 AM