- पंकज पाटील, अंबरनाथकल्याण वालधुनीपासून उल्हासनगरमार्गे अंबरनाथकडे जाणाऱ्या राज्य महामार्गाचे रुंदीकरण उल्हासनगरमध्ये सुरू झाले असले तरी ही कारवाई पूर्ण झाल्यावरही त्याचे काम सुरू होऊ शकणार नाही. कारण, त्यासाठी असलेली आर्थिक तरतूद आणि कामाची मुदत संपली आहे. त्यामुळे अतिक्रमण काढल्यावरही रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे. राज्य महामार्ग क्रमांक ३५चे (नवीन ७६) चौपदरीकरण करण्यासाठी एमएमआरडीएने १०८ कोटींची तरतूद केली होती. त्यातून कल्याण वालधुनी पूल ते अंबरनाथ फॉरेस्ट नाक्यापर्यंतच्या रस्त्याचे काम करण्यात येणार होते. मात्र, काम सुरू झाल्यावर उल्हासनगर आणि अंबरनाथ शहरांतून जाणाऱ्या या मार्गाला लागून असलेल्या अतिक्रमणांचा प्रश्न निर्माण झाला होता. अंबरनाथमध्ये १ हजार ७३ दुकानांचा प्रश्न तर उल्हासनगरमध्ये ८२१ अनधिकृत दुकानांचा प्रश्न होता. याप्रकरणी अंबरनाथच्या व्यापाऱ्यांनी तत्कालीन पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडून रुंदीकरणाला तोंडी स्थगिती आदेश मिळवला होता. पालकमंत्र्याच्या हस्तक्षेपामुळे अधिकाऱ्यांनीही वादात न पडता जिथे रस्ता मोकळा होता, तिथेच कामास सुरुवात करून उल्हासनगर साईबाबा मंदिर ते अंबरनाथ मटका चौकापर्यंतच्या १०० फुटी रस्ता पूर्ण केला. मात्र, त्यानंतर फॉरेस्ट नाक्यापर्यंत केवळ तीनपदरी रस्त्याचेच काम केले. उल्हासनगरमध्ये अनेक बहुमजली व्यापारी गाळे असल्याने तिथे कारवाईला बगल दिली. राजकीय हस्तक्षेपामुळे या महामार्गाचे काम अर्थवटच झाले.
कारवाई झाली, तरीही काम रखडणार
By admin | Published: December 05, 2015 9:09 AM