शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
3
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
4
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
5
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
6
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
7
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
8
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
9
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
10
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
11
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
12
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
13
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
14
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
15
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
16
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
17
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
18
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
19
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
20
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी

दंड न भरल्यास त्या रुग्णालयांची मालमत्ता पालिका करणार जप्त, प्रत्येक खाजगी हॉस्पीटलची पथक करणार पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2020 4:35 PM

महापालिकेने शहरातील दोन खाजगी रुग्णालयांना १६ लाखांचा दंड ठोठावला आहे. परंतु दंडाची रक्कम सात दिवसात न भरल्यास मालमत्ता कर नियमाप्रमाणे कारवाई करण्याचा म्हणजेच वेळ प्रसंगी मालमत्ता जप्त करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे. तसेच या पुढे असे प्रकार घडू नयेत यासाठी ४ जणांचे पथक तयार करण्यात आले आहे.

ठाणे : कोणतीही लक्षणे नसतानाही त्यांना रुग्णांना रु ग्णालयात उपचारासाठी दाखल करून घेतल्याप्रकरणी महापालिका प्रशासनाने दोन खासगी रु ग्णालयांवर कारवाई केली केली आहे. या दोन रुग्णालयांना १६ लाखांच्या दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे. सात दिवसांच्या मुदतीत हा दंड भरला नाहीतर मालमत्ता कर वसुली नियमाप्रमाणेच या दंडाच्या रक्कमेची वसुली करण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. त्यामुळे दंडाची रक्कम भरण्यास टाळाटाळ केली तर संबंधित रु ग्णालयाची मालमत्ता जप्त होण्याची चिन्हे आहेत.           ठाणे महापालिका क्षेत्रातील करोनाबाधित रु ग्णांवर उपचार करण्यासाठी प्रशासनाने खासगी रु ग्णालये ताब्यात घेतली असून ही रु ग्णालये कोवीड रु ग्णालये म्हणून घोषित करण्यात आली आहेत. असे असले तरी शहरातील करोनाबाधित रु ग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून त्या तुलनेत ही रु ग्णालयेही अपुरी पडत आहेत. त्यामुळे एखाद्या रु ग्णांमध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसून येत नसतील किंवा रु ग्णांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नसेल तर त्यांना कोवीड काळजी केंद्र किंवा घरीच उपचार करणे अपेक्षित आहे. अशा रु ग्णांना रु ग्णालयात उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले तर आवश्यक असलेल्या रु ग्णांना रु ग्णालयात उपचारासाठी जागा मिळणार नाही. त्यामुळेच राज्य शासनाकडूनही तशाप्रकारच्या सुचना देण्यात आल्या आहेत. असे असतानाही ठाण्यातील दोन खासगी रु ग्णालयांनी कोणत्याही प्रकारची लक्षणे नसलेल्या आणि त्रासही जाणवत नसलेल्या रु ग्णांना उपचारासाठी दाखल करून घेतले होते. महापालिका प्रशासनाकडून रोजच्या रोज शहरातील रु ग्णालयातील शिल्लक जागांचा आढावा घेतला जात असून या आढाव्यादरम्यान ही बाब समोर आली. त्यानुसार या दोन्ही खाजगी रु ग्णालयांना महापालिका प्रशासनाने चार दिवसांपूर्वी नोटीस पाठविली होती. मात्र, दोन्ही रु ग्णालयांकडून नोटीसला स्पष्टीकरण देण्यात आले नाही. त्यामुळे या नोटीसचा कालावधी संपल्यानंतर महापालिका प्रशासनाने दोन्ही रु ग्णालयांना मिळून १६ लाखांचा दंड आकारण्याचा निर्णय घेऊन त्यासंबंधीची नोटीस बजावली. यामध्ये तीन रु ग्णांना सात दिवस दाखल करून ठेवल्याप्रकरणी एका रु ग्णालयाला तीन लाख तर १३ रु ग्णांना ७ दिवस रु ग्णालयात दाखल करून ठेवल्याप्रकरणी १३ लाख रु पयांचा दंड आकरण्यात असल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त विश्वानाथ केळकर यांनी दिली. सात दिवसांच्या मुदतीत हा दंड भरला नाहीतर मालमत्ता कर वसुली नियमाप्रमाणेच या दंडाच्या रक्कमेची वसुली करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानुसार वेळ प्रसंगी संबधींत रुग्णालयांची मालमत्ताही जप्त होऊ शकणार आहे.दुसरीकडे असे प्रकार टाळण्यासाठी महाापलिकेने चार जणांचे एक पथक तयार केले असून या पथकाचे माध्यमातून शहरातील या रुग्णालयांवर देखरेख ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे अशा त्रुटी किंवा चुका आढळल्यातर इतर रुग्णालयांवर देखील कारवाई केली जाईल असा इशारा पालिकेने दिला आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाhospitalहॉस्पिटल