शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

गॅसबाबत चुकीची हमीपत्रे आढळल्यास कारवाई, ई पॉस मशीनद्वारे वितरण सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 4:17 PM

५९० रास्त भाव दुकानांच्या माध्यमातून अन्नधान्याचे ८८ टक्के वाटप ई पॉस मशीनच्या माध्यमातून ऑनलाइन होत असून त्यामुळे संपूर्ण यंत्रणेत पारदर्शीपणा आणि वेग आला आहे.

ठाणे : जिल्ह्यात ५९० रास्त भाव दुकानांच्या माध्यमातून अन्नधान्याचे ८८ टक्के वाटप ई पॉस मशीनच्या माध्यमातून ऑनलाइन होत असून त्यामुळे संपूर्ण यंत्रणेत पारदर्शीपणा आणि वेग आला आहे. अनावश्यक लाभार्थी कमी झाल्याने धान्याची बचतही झालेली आहे. यावर्षी ऑगस्टपासून ई पॉसद्वारे केरोसीन विक्रीही करण्यात येत असून, शिधापत्रिकाधारकांकडून गॅस नाही अशी हमी पत्रे घेण्यात येत आहेत. चुकीची हमीपत्रे आढळल्यास कार्डधारकांवर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी जलसिंग वळवी यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली.जिल्ह्यात एकुण केरोसीनचे पात्र कार्डधारक 1 लाख 38हजार 953 असून पॉसद्वारे विक्री सुरू झाल्यानंतर 72 कि.लि. केरोसिनची गरज कमी झाली आहे. रास्त भाव दुकानांच्या मार्फत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजेनच्या लाभार्थ्यांस धान्य वाटप करण्यात येते. अंत्योदय योजनेच्या मुरबाड-10959, शहापूर-17617, भिवंडी-11449, कल्याण- 2425, अंबरनाथ-3674 अशा एकुण 46 हजार 174 इतक्या शिधापत्रीका आहेत. तर प्राधान्य कुटुंब योजनेचे मुरबाड-16868, शहापूर-28014, भिवंडी-28571, कल्याण-12572, अंबरनाथ-7600 असे एकूण 93 हजार 625 शिधापत्रिका आहेत. अंत्योदय व प्राधान्य योजनेच्या मिळून एकूण 1 लाख 39 हजार 799 शिधापत्रिका आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.जिल्हा पुरवठा अधिकारी ठाणे यांच्या कार्यक्षेत्रात मुरबाड तालुक्यात 196, शहापूर-165, भिवंडी-157, कल्याण-42, अंबरनाथ-31 अशी एकुण 591 इतकी रास्त भाव धान्य दुकाने आहेत. ऑक्टोबर 2018 मध्ये 121525 (88.42 %) कार्डधारकांस पॉसद्वारे आधारबेस धान्य वाटप करण्यात आले आहे. उर्वरीत लाभार्थ्यांचे पॉसमध्ये नाव नोंदणी झालेली नसल्याने त्यांना ऑफलाइन वाटप करण्यात येत आहे. या महिन्यात 100% शिधापत्रिकांचे संगणकीकरण पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.