भिवंडी : शासनाकडून आॅनलाईन कार्यालयीन कामे करण्यावर भर देत असताना भिवंडी महानगरपालिकेची वेबसाईड बंद असल्याचे आज उघडकीस आल्याने सरकार जरी आॅन लाईन असले तरी पालिकेचे अधिकारी आॅफ लाईन असल्याचे आढळून आले.शासनामार्फत भिवंडी महानगरपालिकेची वेबसाईड सुरू असुन या वेबसाईडवरून महानगरपालिकेचे सर्व आॅनलाईन कामकाज सुरू असतात. बांधकाम विभागाचे टेंन्डर,नागरीकांच्या तक्रारी,ई-मेल आदि कामकाज या वेबसाईडवरून सुरू असतात तसेच अधिकाऱ्यांचे फोन आणि कार्यालयीन माहिती माहिती मिळविण्याचा प्रयत्न नागरिकांकडून केला जातो. तसेच दररोज ही वेबसाईड अपडेट झाली पाहिजे असे असताना पालिकेच्या संगणक कार्यालयांकडून वेबसाईड अपडेट न करता शासनाच्या आॅन लाईन कारभाराला तिलांजली दिल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.पालिकेच्या वेबसाईडची लिंक उघडत नसल्याने वेबसाईड बंद असल्याचे उघड झाले आहे. शासनाच्या महानगरपालिका अंतर्गत स्पर्धात्मक स्वच्छ भारत अभियान शहरात सुरू आहे.त्यानुसार शहरवासीयांनी उत्सुकतेपोटी पालिकेच्या वेबसाईडची लिंक सुरू करण्याचा प्रयत्न केला.मात्र त्यांना पालिकेची वेबसाईड बंद असल्याचे दिसून आले.तर बांधकाम विभागाची ३६ कोटी रूपयांची कामे नुकत्याच झालेल्या महासभेत पास झाल्याने त्याची माहिती मिळविण्यासाठी शहरातील ठेकेदारांनी व नगरसेवकांच्या काही हितचिंतकांनी पालिकेची लिंक सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या पदरी निराशा आली.मात्र याबाबत पालिकेच्या संगणक विभागाकडे कोणीही तक्रार केली नाही.या बाबत पालिकेच्या संगणक विभागाचे व्यवस्थापक मंदार जोशी यांच्याशी संपर्क केला तो पर्यंत ही वेबसाईड बंद असल्याचे माहित नव्हते.त्यांनी वेबसाईड तपासण्याच्या नांवाखाली मोबाईल उचलणे सोडून दिले.त्यामुळे पालिकेच्या संगणक विभागावर नागरीकांचा संशय बळावला आणि शहरात चर्चेचे गु-हाळ सुरू झाले.पालिका प्रशासन आपली वेबसाईड सुरू करणे व अपडेट करणे,यावर करीत असल्याचा खर्च अधिका-यांच्या बेफिकिरीमुळे फुकट जात असल्याचे आढळून आले.याबाबत पालिकेचे आयुक्त मनोहर हिरे यांच्याशी संपर्क साधला असता,त्यांनी सांगीतले की,पालिकेची वेबसाईड एनआयसी मार्फत सुरू असुन ती बंद होण्यास सरवरचे इश्यु असू शकतात.मात्र सरवरचा अथवा वेबसाईडच्या बीलाचा इश्यु नाही.तसेच या बाबत अधिक माहिती घेऊन कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगीतले.
सरकार आॅन लाईन तर भिवंडी महानगरपालिका आॅफ लाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 11:36 PM
भिवंडी : शासनाकडून आॅनलाईन कार्यालयीन कामे करण्यावर भर देत असताना भिवंडी महानगरपालिकेची वेबसाईड बंद असल्याचे आज उघडकीस आल्याने सरकार जरी आॅन लाईन असले तरी पालिकेचे अधिकारी आॅफ लाईन असल्याचे आढळून आले.शासनामार्फत भिवंडी महानगरपालिकेची वेबसाईड सुरू असुन या वेबसाईडवरून महानगरपालिकेचे सर्व आॅनलाईन कामकाज सुरू असतात. बांधकाम विभागाचे टेंन्डर,नागरीकांच्या तक्रारी,ई-मेल आदि कामकाज ...
ठळक मुद्देभिवंडी महानगरपालिकेची वेबसाईड बंदपालिकेच्या संगणक व्यवस्थापकाची बेफिकीरी पालिकेची वेबसाईडचे काम एनआयसी मार्फत