लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : एखाद्या खून करणाऱ्या व्यक्तीस आपल्या देशात फाशीची किंवा आजन्म कारावासाची शिक्षा होते. पण त्याचवेळी रस्ते अपघातात लोकांच्या मृत्युस जबाबदार असणाºयाला मात्र केवळ अडीच वर्षाची शिक्षा होते. कायद्यातील ही विसंगती दूर होणे गरजेचे असून त्यामुळे रस्ते अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन ठाणे शहर गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त संजय येनपुरे यांनी बुधवारी केले.ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाच्या समारोप समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले, परदेशात वयोगटानुसार विविध अश्वशक्तीची वाहने चालविण्यास परवानगी दिली जाते. त्याबाबतचे नियमांचीही कठोर अंमलबजावणी केली जाते. तसाच निकष भारतातही लागू करण्याची आवश्यकता आहे. तर आपल्याकडेही नियम पाळण्याचा कल अधिक वाढेल. परिणामी, अपघात रोखण्यात मोठी मदत होईल. यावेळी अपर जिल्हाधिकारी वैदही रानडे म्हणाल्या, माझा प्रवास ही माझी जबाबदारी आहे, हे ब्रीद पाळल्यास अपघाताचे प्रमाण कमी होईल. मी वाहतुकीचे सर्व नियम पाळीन, वाहतूक पोलीस किंवा परिवहन अधिकारी यांच्याशी हुज्जत घालणार नाही. नियमभंग झाल्यास आवश्यक तो दंड भरेन, ही वृत्ती अंगिकारल्यास रस्ते प्रवास अधिक सुरक्षित होईल.यावेळी निबंध स्पर्धेतील विजयी विद्यार्थिनी, कोरोना महामारीच्या काळात सेवा देणाºया आणि रिक्षात विसरलेल्या मौल्यवान वस्तू प्रामाणिकपणे नागरिकांना देणाºया अबोली रिक्षा चालिका आदींना गौरविण्यात आले. कार्यक्र माचे प्रास्ताविक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वंभर शिंदे यांनी केले. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी आभार मानले. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र गायकवाड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील आणि तानाजी चव्हाण आदी उपस्थित होते. सूत्रसंचलन राजेंद्र पाटणकर यांनी केले.
कायद्यातील विसंगती दूर झाल्यास रस्ते अपघातही कमी होतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 9:29 PM
ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाच्या समारोप समारंभात ठाणे शहर गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त संजय येनपुरे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले, परदेशात वयोगटानुसार विविध अश्वशक्तीची वाहने चालविण्यास परवानगी दिली जाते. त्याबाबतचे नियमांचीही कठोर अंमलबजावणी केली जाते. तसाच निकष भारतातही लागू करण्याची आवश्यकता आहे.
ठळक मुद्देसंजय येनपुरे यांचे प्रतिपादनरस्ते सुरक्षा अभियान