ठाणे: मॉडेला नाक्याजवळील भूखंडावर ठाणे महापालिकेने ट्रक टर्मिनल लवकर उभारले नाही तर लोकसहभागातून ते उभारू, असा इशारा ठाण्याचे भाजपचे आमदार संजय केळकर यांनी प्रशासनाला दिला आहे. दरम्यान, त्यांनी वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांसोबतही बैठक घेऊन वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अनेक महत्वपूर्ण सूचना केल्याची माहिती सूत्रांनी दिली.शहरात मेट्रोसह अन्य कामे सुरु असल्याने रस्ते अरुंद झाले आहेत. त्यात दुतर्फा उभ्या वाहनांनी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. त्याचा नाहक त्रास ठाणेकरांना सहन करावा लागत आहे. या समस्येबाबत सातत्याने पाठपुरावा करणाºया आमदार केळकर यांनी ठाणे महापालिकेला ट्रक टर्मिनल संदर्भात पुन्हा एकदा आठवण करु न दिली आहे. मॉडेला नाक्याजवळील भूखंड ट्रक टर्मिनलसाठी उपलब्ध असल्याचे पत्र पालिका प्रशासनाने केळकर यांना चार वर्षांपूर्वीच दिले होते. असे असतानाही त्याठिकाणी ट्रक टर्मिनल अद्याप का उभारले नाही, असा प्रश्न केळकर यांनी प्रशासनासह सत्ताधाºयांना केला आहे. ‘ट्रक टर्मिनलऐवजी भूखंडाचे श्रीखंड करु नका’, असा टोलाही त्यांनी सत्ताधाºयांना लगावला आहे. या भूखंडावर सुमारे ५०० वाहनांची सोय होणार आहे. वाहतूक कोंडी आणि अवैध पार्र्किं ग टाळण्यासाठी या वाहनतळाचा मोठा उपयोग होणार आहे. याबाबत तत्कालीन पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याबरोबर वेळोवेळी बैठका झाल्या होत्या. पण अजूनही ठोस कारवाई न झाल्याने ही सुविधा रद्द होते की काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. या भूखंडावर कोणाचा डोळा असेल तर त्याविरु द्धही आवाज उठऊ, पालिका वाहनतळ उभारत नसेल तर वेळ पडल्यास लोकसहभागातून ट्रक टर्मिनल उभारू, असा इशाराही केळकर यांनी दिला आहे.बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई कराठाणे शहरातील स्मार्ट सिटी अंतर्गत कामांना गती, नवीन वाहनतळ, गतीरोधक आणि वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी पालिकेचे अधिकारी आणि वाहतूक नियंत्रण शाखेचे अधिकारी यांच्या समवेत आमदार केळकर यांनी नुकतीच बैठक घेतली. स्व. मीनाताई ठाकरे चौक येथील उड्डाणपूल दुतर्फा वाहतुकीसाठी त्वरित खुला करावा, अशी सूचना त्यांनी यावेळी केली. मासुंदा तलाव सुशोभीकरण, गावदेवी वाहनतळ, वॉटर फ्रंटची कामे, स्मार्ट सिटी अंतर्गत सुरु असलेल्या सर्व कामांचा आढावाही यावेळी त्यांनी घेतला. रेल्वे स्थानक परिसरातील वाहतुकीचे योग्य नियोजन होण्यासाठी सॅटीसवर रिक्षा थांबा करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. प्रभात सिनेमा आणि गडकरी रंगायतनजवळील जागा तसेच नौपाडा पोलीस ठाण्यासमोरील आरक्षित जागा वाहनतळांसाठी घेऊन त्याठिकाणी वाहनतळे उभारावीत, यासाठी केळकर हे गेल्या तीन वर्षांपासून पाठपुरावा करीत आहेत. त्याबाबत कार्यवाही करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी करु न बेशिस्त आणि अरेरावी करणाºया रिक्षा चालकांवर कारवाई करण्याची सूचनाही त्यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे महापालिकेला जमणार नसेल तर लोकसहभागातून ट्रक टर्मिनस उभारू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2020 12:03 AM
मॉडेला नाक्याजवळील भूखंडावर ट्रक टर्मिनस ठाणे महापालिकेने लवकर उभारले नाही तर लोकसहभागातून ते उभारू, असा इशारा ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी प्रशासनाला दिला आहे. भूखंडाचे श्रीखंड करु नका, असा टोलाही त्यांनी अप्रत्यक्षपणे सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.
ठळक मुद्देआमदार संजय केळकर यांनी वाहतूक कोंडीविरोधात थोपटले दंड सुमारे ५०० होणार सोय भूखंडाचे श्रीखंड करु नका