ठाणे : येत्या १ ऑक्टोबरपासून टोलमध्ये दरवाढ प्रस्तावित केली असून या प्रस्तावित दरवाढीला मनसेने तीव्र विरोध दर्शवला आहे. मनसेचेठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी पक्षाच्या पदाधिकाºयांसमवेत मुलुंड टोल नाक्यावर टोल प्रशासनाच्या अधिकाºयांची भेट घेतली असून ही टोलवाढ करू नये असे निवेदन प्रशासनाला दिले आहे. आता शांततेत निवेदन देण्यात आले असले तरीही १ रुपयांनी जरी टोलवाढ झाली तर गाठ आमच्याशी आहे, असा सज्जड इशाराच अविनाश जाधव यांनी प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे टोलनाक्यावरून राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे आहेत.
टोलमुक्तीसाठी सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेणा?्या मनसेने आता टोल दरवाढीच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या ऑक्टोबर पासून ५,१०, २० आणि ३० रुपयांनी टोलमध्ये दरवाढ करण्यात येणार आहे. मात्र ही दरवाढ कोणत्याही परिस्थितीमध्ये होऊन देणार नाही अशी भूमिका मनसेने घेतली आहे. याचाच एक भाग म्हणून मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, मनसेचे पदाधिकारी संदीप पाचंगे, रवी मोरे ,पुष्कराज विचारे, स्वप्नील महिन्द्रीकर यांनी मुलुंड टोलनाका येथे जाऊन टोल प्रशासनाच्या अधिकरायची भेट देऊन त्यांना टोलवाढ करण्यात येऊ नये असे निवेदन दिले आहे.सरकारने आम्हाला चचेर्साठी बोलवावे, आम्ही चर्चा करायला तयार आहोत.
मुलुंडचा टोलनाका वास्तविक आतापर्यंत बंद होणे अपेक्षित असताना तो अजूनही बंद झालेला नाही. हा रस्ता आता मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत येत असल्यानं एमएमआरडीए टोल कसा काय वसूल करू शकते असा प्रश्न देखील जाधव यांनी यावेळी उपस्थित केला.सरकारने आम्हाला चचेर्साठी बोलवावे, आम्ही चर्चा करायला तयार आहोत. मात्र यामद्ये १ रुपयांनीही वाढ होऊन देणार नसल्याची भूमिका जाधव यांनी घेतली आहे. दरम्यान अविनाश जाधव यांच्यासह मनसेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना नवघर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.