ठाणे : आज लाईट,पंखा, कुलर, एसी चालू आहे, माईक पण चालू आहे. याठिकाणी कोणी कोणाचा आवाज दाबू शकत नाही हा देवीचा दरबार आहे. कोणाच्या मालकीचा दरबार नाही. देवीच्या दरबारात जर कोणी असे करत असेल तर त्या राक्षसाचा वध केल्याशिवाय राहणार नसल्याची टिका शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी केली. राक्षसी प्रवृत्ती देशात फोफावत आहे, प्रत्यके गोष्टीत राजकारण आणले जात आहे. त्यामुळे या देवीच्या दरबारात सर्वांना सारखी वागणुक मिळाली पाहिजे असेही ते म्हणाले.
विचारे यांनी गुरुवारी टेंभी नाका येथील देवीचे दर्शन घेत महाआरती केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलतांना ही टिका केली. नवसाला पावणारी आणि भक्ताच्या हाकेला धावणारी अशी या देवीची महिमा आहे. देवी कडे मागावें लागत नाही ती न मागता देते. देवीकडे मागणं चुकीचे आहे ती जे देईल त्यात समाधान मानायचे असते. एखाद्याच समधान होत नसेल त्याला काही करू शकत नसल्याचेही ते म्हणाले.ही देवी सर्वांचीच आहे ती सवार्नाच भरभरून देते. देवीला सर्व भक्त सारखेच असतात, ती सर्वांनाच भरभरुन देत असते.
दसरा मेळाव्यावरुन त्यांना छेडले असता, शिवसेना पक्षाचा जन्म ५७ वर्षांपूर्वी झाला. प्रबोधनकार ठाकरे त्यावेळी होते, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे त्यावेळी छोटे होते मराठी लोकांच्या न्याय हक्कासाठी ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या तत्त्वावर निर्मिती झाली. किती आले किती गेले आज शिवसेना आहे तिथे आहे , उलट संघटना दहा पटीने वाढली आहे. कारण संघटनेचा जन्मच त्यासाठी आहे. कोणी या संघटनेला संपवण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्रातली जनता संघटनेच्या पाठीशी असल्याचे ते म्हणाले.
आझाद मैदानावर होणाºया मेळाव्यावरुन मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला मी बांधील नसल्याचे ते म्हणाले. ५७ वर्षांमध्ये या शिवाजी पार्क ला विचारांचे सोन वषार्तून एकदा शिवसैनिकांना मिळत असते ते एक प्रकारचे टॉनीकच असते. त्यामुळे विचारांचे सोन घेऊन वर्षभरातील काम होत असतात. शिवाजीपार्क वर गर्दी जमवण्याची ताकद कुणाची नाही ती फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
उध्दव ठाकरे यांचे हिदुंत्व मिलवट असल्याचा आरोप मुख्यमंत्री शिंदे यांनी केला असतांना मुख्यमंत्र्यांनी स्वत:ची काळजी करावी, त्यांनी गद्दारी करून हा पक्ष सोडलेला आहे. त्यांनी आम्हाला विचार देण्याची गरज नाही. शिवसेना पक्षाचे विचार हे हिंदुत्वादी असून तेच आमचे राष्ट्रीयत्व असल्याचेही ते म्हणाले. जरांगे पाटील त्यांच्या आंदोलनाला आमचा पाठींबा आहे. त्यांचे आंदोलन शांततेत सुरू आहे. परंतु राज्यात आणि केंद्रात सत्ता आहे पण प्रत्येक जाती धमार्तील लोकांना एक एक महिन्याची वेळ देऊन सरकार त्यांना खेळवत असून निवडणुक येऊद्या जनता त्यांना दाखवून देईल असेही ते म्हणाले.