ठाणे : ठाणे महापालिकेने शनिवारपासून मास्क न लावणाऱ्या ठाणेकरांकडून दंड आकारणी सुरू केली असताना या दंडापासून ठाणेकरांचा बचाव करण्यासाठी मनसेने रविवारी सकाळी मोफत मास्क वाटप केले आहे. मास्क न लावणाºयाकडून दंड आकारणी करणाºया महापालिकेने रस्त्यांवरील खड्ड्यास जबाबदार असणाºया अधिकाऱ्यांकडून ५० हजारांचा दंड वसूल करावा अशी मागणी करीत याचा पाठपुरावा करणार असल्याचे मनसेने यावेळी सांगितले. विना मास्क सार्वजनिक ठिकाणी फिरणाºया व्यक्तीविरूद्ध ठाणे महानगरपालिकेने सुरू केलेल्या मोहिमेमध्ये शनिवारी एकूण ११६ व्यक्तींविरूद्ध दंडात्मक कारवाई करून ५८ हजार रूपयांचा दंड वसूल केला. याला प्रत्युत्तर म्हणून मनसेने मोफत मास्क वाटप केले. रविवारी सकाळी शहरातील दोन हजार नागरिकांना मास्क वाटण्यात आले. महापालिकेने घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. परंतू कोरोनाकाळात ठाणेकरांच्या खिशाला कात्री बसलेली असताना त्यांच्याकडून दंड वसुली करण्याआधी सुरूवातीला त्यांना समज देण्यात यावी असे मनसेचे कोपरी पाचपाखडी विभाग अध्यक्ष महेश कदम यांनी म्हटले आहे. विना मास्क संचार करणाºया नागरिकांकडून महापालिका ५०० रुपये दंड वसूल करीत असेल तर रस्त्यांवर ठिकठिकाणी जिथे जिथे खड्डे पडलेत त्या त्या संबंधित अधिकाºयांकडून ५० हजार रुपयांचा दंड वसूल करावा. तसेच, मास्क न वापरणाºया नागरिकांवर कारवाई करताना ठाणे महापालिकेने अधिकारी - कर्मचाºयांना जे नियम दिले आहेत ते मात्र कुठेही पाळले जात नाही. अधिकारी - कर्मचारी ठाणेकरांशी उद्धट वर्तवणूक करीत असल्याचा आरोप करीत कदम यांनी त्यांच्याकडून पाच हजार रुपये दंड वसूल करावा अशी मागणी पालिका प्रशासनाला केली आहे.
दंड वसूल करताय मग खड्ड्यास जबाबदार अधिकाऱ्यांकडूनही दंड वसूली करा : मनसेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 4:55 PM
दंड भरण्यापेक्षा मोफत मास्क न्या असे मनसेने आवाहन केले.
ठळक मुद्देखड्ड्यास जबाबदार अधिकाऱ्यांकडूनही दंड वसूली करा : मनसेची मागणीदंड भरण्यापेक्षा मोफत मास्क न्या असे मनसेने केले आवाहन शनिवारपासून मास्क न लावणाऱ्या ठाणेकरांकडून दंड आकारणी