शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
3
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
4
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
5
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
6
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

झेपत नसेल तर सत्ता सोडा

By admin | Published: July 16, 2017 2:55 AM

शहरातील मुजोर रिक्षावाल्यांविरोधात नागरिक रस्त्यावर उतरत आहेत. फेरीवाल्यांविरोधात मानवी साखळी नागरिकांनीच करायची. प्रदूषणाचा त्रास झाल्यास

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : शहरातील मुजोर रिक्षावाल्यांविरोधात नागरिक रस्त्यावर उतरत आहेत. फेरीवाल्यांविरोधात मानवी साखळी नागरिकांनीच करायची. प्रदूषणाचा त्रास झाल्यास त्यासाठीही नागरिकांनीच आवाज उठवायचा. सगळे जर नागरिकांनीच करायचे, तर मग सत्ताधाऱ्यांचा उपयोग काय? महापौर, मंत्री, आमदार, खासदार, नगरसेवकांनी काय, फक्त मोजायचे? २२ वर्षे करता काय मग? सत्ता झेपत नाही सांगा आणि सोडून द्या ना, असा टोला मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी शिवसेनेला लगावला आहे.‘लोकमत’च्या ‘हॅलो ठाणे’मधील ‘फेरीवाल्यांविरुद्ध आता मानवी साखळी’ या शीर्षकाखाली शनिवारी प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल कदम यांनी घेतली. शिवसेना शहरप्रमुख भाऊ चौधरी यांना लक्ष्य करत त्यांनी वरील टोला लगावला. फेरीवाल्यांविरोधात उपोषणास्त्र शिवसेनेने काढले होते. त्यांच्याच पक्षातील ज्येष्ठ नगरसेवकाने पत्रकार परिषद घेत फेरीवाल्यांविरोधात सातत्याने आवाज उठवणार, असा गाजावाजा केला होता. या प्रश्नावर केडीएमसीची महासभाही तहकूब केली होती. पण, तरीही फेरीवाला प्रश्न ‘जैसे थे’ आहे. म्हणजेच, सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर अंकुश नाही, हे स्पष्ट झाले. प्रशासनावरील त्यांची पकड ढिली होत आहे. त्यामुळेच समस्या वाढत आहेत, अशी टीका कदम यांनी केली.मुजोर रिक्षाचालकांविरोधात कारवाई होत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. सत्ताधारी शिवसेना काहीच करत नसल्याने नागरिकांनीच पुढाकार घेत ‘प्रोटेस्ट अगेन्स्ट आॅटो’ असा मंच स्थापन केला. पण, सत्ताधाऱ्यांनी हा प्रश्न का मार्गी लावला नाही. त्यासाठी नागरिकांनाच का रस्त्यावर उतरायला लागत आहे, याकडे कदम यांनी लक्ष वेधले. एमआयडीसी परिसरात रासायनिक कंपन्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा गंभीर प्रश्न आहे. कंपन्या रासायनिक सांडपाणी प्रक्रिया न करता थेट नाल्यात सोडत आहेत. तसेच वायूप्रदूषणामुळे श्वास गुदमरत आहे. त्यातही सत्ताधारी कमी पडत आहेत. गुन्हेगारीमध्येही सांस्कृतिक उपराजधानी आघाडीवर आहे. वरिष्ठ पोलिसांच्या बदलीसाठी प्रयत्न करणारे सत्ताधारी शहरातील गुन्हेगारी कमी व्हावी, यासाठी प्रयत्न का करत नाहीत. त्यासाठीही आता नागरिकांमधूनच त्यांना अपेक्षा आहे का, असा सवाल कदम यांनी केला. अस्वच्छता, बेधुंदपणा, मनमानी यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. खेळण्यासाठी मैदाने नाहीत. ज्येष्ठांना विरंगुळा नाही. दिवसाढवळ्या हत्या होत आहेत. फेरीवाला, वाहतूककोंडी, पाणीसमस्या, कचरा, खंडित होणारा वीजपुरवठा अशा सर्वच समस्या शहरात आहेत. पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. सत्ताधाऱ्यांनी समस्या सोडवून नागरिकांना दिलासा द्यावा. २२ वर्षे सत्ता देऊनही सोयीसुविधा मागाव्या का लागतात, अशी टीका कदम यांनी केली. प्रदेश उपाध्यक्षांना केवळ केडीएमसीतच रसकल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसे विरोधी पक्षात आहे. मात्र, त्यांचे अस्तित्वच असून नसल्यासारखे आहे. राजेश कदम हे प्रदेश उपाध्यक्ष आहेत, पण तरीही ते या महापालिकेभोवतीच लक्ष का घालतात? याचाच अर्थ त्यांचा येथील विरोधीपदावर असलेल्या पदाधिकाऱ्यांवर विश्वास नाही. त्यामुळे त्यांच्याच पक्षात फाटाफूट, गटबाजी आहे. त्यांनी आम्हा सत्ताधाऱ्यांबाबत बोलणे म्हणजे ‘स्वत:चे ठेवावे झाकून अन्...’ असे झाल्याची टीका भाऊसाहेब चौधरी यांनी दिली.