कल्याण : कोरोना रुग्णसंख्या कमी होत असली, तरी गाफील राहू नका. नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई चालूच ठेवा. लॉकडाऊन नको असेल तर नियम पाळा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. तसेच मंदिरे सुरू करण्याबाबत दिवाळीनंतर विचार करू, असेही ते म्हणाले. कल्याण पश्चिमेतील लालचौकी येथील आर्ट गॅलरी कोविड समर्पित रुग्णालयाचा व टिटवाळा येथील रुक्मिणी प्लाझा संकुल येथील सामान्य रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा रविवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाइन संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत हाेते.
माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेमुळे कोरोना रुग्णसंख्या कमी होण्यास निश्चितच मदत झाली आहे. त्यामुळे दिवाळीनंतरही ही मोहीम पुन्हा एकदा राबविण्याची आवश्यकता आहे. ती राबविण्यावर अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी भर दिला पाहिजे. रुग्णसंख्या कमी होत असताना रुग्णालयांच्या उद्घाटनांचा घाट घातला जात आहे, अशी टीका हाेत आहे. त्याकडे लक्ष देऊ नका असा सल्ला दिला.
लालचाैकी येथील रुग्णालयात A खाटा
लालचौकी येथील सुमारे चार हजार ५०० चौ.मी. जागेत कोविड समर्पित रुग्णालय उभारण्यात आले आहे. या इमारतीत तळमजल्यावर संपूर्णत: वातानुकूलित अतिदक्षता विभाग तयार करण्यात आला असून यामध्ये १०७ खाटांची सुविधा आहे.