शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

तटरक्षककडून मच्छिमारांची उपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 12:01 AM

दुर्घटनाग्रस्तांना मच्छिमारच वाचवितात; तटरक्षकदलाची कवडीची मदत होत नाही, संदेश व्यर्थ

- हितेन नाईकपालघर : मच्छिमार हे देशाच्या संरक्षणात महत्वपूर्ण भूमिका बजावणारे सैनिक असून ते समुद्रातले आमचे डोळे आणि कान असल्याची स्तुती सुमने कोस्टगार्ड, नेव्हीचे अधिकारी नेहमीच व्यासपीठावरून उधळत असले तरी जेंव्हा समुद्रात मच्छिमारावर संकटे येतात तेव्हा ते कधीही वेळेवर धाव घेत नाहीत. बचावकार्य करीत नाहीत. ही अशी उदासिनता का? असा खडा सवाल तरुण मच्छिमार आता विचारू लागले आहेत.खोल समुद्रातील संशयास्पद हालचाली संदर्भात आजही किनारपट्टीवरील प्रत्येक मच्छिमार बांधव जागरुकतेने आवश्यक ती माहिती स्थानिक पोलीस, कोस्ट गार्ड यांना तत्परतेने कळवित असतात. जिल्ह्यातील प्रत्येक सागरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील तटरक्षक दल व पोलीसांचा मित्र म्हणून मच्छिमार तरुण आपली भूमिका चोखपणे बजावीत असतात. एखादे संशयास्पद जहाज समुद्रात दिसल्याची माहिती पोलिसांना कळविल्या नंतर मच्छिमार आपली स्वत:ची बोट पोलिसांना धाव घेण्यासाठी उपलब्ध करून देऊन तसेच स्वत:ही पोलिसांसोबत जाऊन धोका पत्करत असतो. अशावेळी सुरक्षा यंत्रणेच्या स्पीड बोटी मात्र किनाऱ्यावर बंद पडलेल्या अवस्थेत पडून असतात. संकटात सापडलेल्या आपल्या बांधवांना व सुरक्षायंत्रणांना मच्छिमार नेहमीच मदत करीत असतात.२६/११ चा समुद्रीमार्गाने झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर समुद्रातील संरक्षण यंत्रणा मजबूत करण्याच्या नावाखाली मच्छीमारांकडील कागदपत्रे तपासली जातात. त्यात एखाद्याचे एखादे कागदपत्र कमी असल्यास बोट मालकासह अन्य लोकांचा अनन्वित छळ केला जात होता. अशा अमानवी कृत्याच्या विरोधात मच्छिमार संघटनांनी संरक्षण विभागाच्या वरिष्ठ पातळीवर तक्र ारी केल्यानंतर आता या छळात काहीशी घट झाली आहे.सातपाटीमधील ‘शिवनेरी नौका’ ८ मे रोजी समुद्रात मासेमारी करीत असताना महाकाय लाटांच्या तडाख्यात सापडून बुडाली होती. या घटनेची माहिती वायरलेस सेट वरून कळाल्यानंतर तात्काळ मदत उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हाधिकाºयांना आणि कोस्टगार्डला कळविण्यात आले. ११ मच्छीमारांच्या जीविताला धोका उत्पन्न झालेला असतांना कोस्ट गार्ड ने आपल्या स्पीडबोटी आणि हेलीकॉप्टरच्या मदतीने घटनास्थळी पोहचणे अत्यावश्यक असताना घटना घडून अनेक तासानंतर त्यांच्या घिरट्या दिसून आल्या होत्या. समुद्रातील जीपीएस नंबर वरून समुद्रात बोट कुठे आहे. याचे लोकेशन तात्काळ मिळत असतांना तसेच जवळपासच्या प्रत्येक बोटीतील वायरलेस सेटवरून माहिती मिळत असूनही व आम्ही संकटात असतांना कोस्टगार्ड आमच्या मदतीला वेळीच का धावून येत नाही? हा सवाल प्रत्येक मच्छिमार तरुणांच्या मनात धुमसतो आहे.डहाणूमधील भानुदास तांडेल यांची भाग्यलक्ष्मी बोट ३० नॉटिकल (किनाºयापासून सुमारे ६० किमी)वर बुडाली असतांना त्यांना तात्काळ मदत मिळावी म्हणून डहाणूतील काही मच्छिमार जवळच्याच कोस्ट गार्ड कार्यालयात पोहोचले. समुद्रात संकटात सापडलेल्या ११ मच्छीमारांना तात्काळ मदत करावी अशी विनंती त्यांनी अधिकालºयांना केली होती. मात्र समुद्र खवळलेला असल्याने आम्ही काही मदत करू शकत नाही अशी हतबलता कोस्टगार्ड ने व्यक्त केली होती. मात्र त्याच वादळीवाºयात आणि तुफानी लाटांचा मारा थोपवित डहाणूतील अशोक आंभिरे, भूपेश मरदे, नागेश मरदे, गणेश तांडेल, दाजी तांडेल आदी मच्छीमारांनी आपल्या बोटीद्वारे तात्काळ धावून जात बुडालेली बोट आणि त्यामधील ११ मच्छीमाराना वाचविले. त्यांना मंगळवारी दुपारी ३ वाजता सुखरूप डहाणूच्या किनाºयावर आणण्यात यश मिळविले. या संदर्भात डहाणू कोस्ट गार्डचे कमांडन्ट एम विजयकुमार यांच्याशी संपर्क साधला असता कोस्ट गार्ड नेहमीच मच्छिमारांच्या सोबत आहे. वादळी वातावरण आणि बोटी घटनास्थळा पासून लांब असल्याने तात्काळ मदत पुरवू शकलो नाही, अशी कबुली त्यांनी दिली.अंभीरे व सहकाºयांना पुरस्कार द्याकोस्टगार्डच्यावतीने देण्यात येत असलेला ‘शौर्य पुरस्कार क्रियाशील मच्छिमार अशोक आंभिरे आणि त्यांच्या सहकाºयांना ही देण्यात यावा अशी मागणी ठाणे-पालघर जिल्हा मच्छिमार मध्यवर्ती संघाचे अध्यक्ष जयकुमार भाय यांनी केली आहे. असे घडून आल्यास त्याचा सकारात्मक परिणाम मच्छिमारांवर नक्कीच घडून येईल.समुद्रात अनेक संकटांशी सामना करीत ११ खलाशांचे प्राण वाचविण्यात मुख्य भूमिका बजाविणाºया मच्छीमाराना नॅशनल मेरिटाईम सर्च अ‍ॅण्ड रेस्क्यू अ‍ॅवॉर्डने सन्मानित करा, अशी सूचना मी अधिकाºयांना केली आहे.- नरेंद्र पाटील,अध्यक्ष, एनएफएफ संघटना.

टॅग्स :palgharपालघर