मीरा रोड : हजारो नागरिकांना रोजगार देणाऱ्या शहरातील जुन्या औद्योेगिक वसाहती आणि गोरगरिबांच्या घरांवर बुलडोझर फिरवून त्यांना उद्ध्वस्त करणा-या मीरा-भार्इंदर महापालिकेला आॅर्केस्ट्रा बार, लॉजवर कारवाईसाठी मुहूर्त मिळत नाही का? यावर, कारवाईची आयुक्तांची हिंमत नाही का, असे सवाल आमदार प्रताप सरनाईक यांनी विचारले आहेत. या अनैतिक व्यवसायात सत्ताधारी भाजपासोबत पालिका प्रशासनही भागीदार असल्याचा संशय सरनाईक यांनी वर्तवला आहे.मीरा-भार्इंदर महापालिकेने शहरात रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली मनमानीपणे सर्व नियम गुंडाळून जुनी बांधकामे तोडण्याची मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेत पालिकेने ग्रामपंचायत काळापासून असलेल्या औद्योगिक वसाहती अणि राहती घरे यांच्यावर बुलडोझर फिरवला होता. कोणतीही पूर्वसूचना न देता पालिकेने आमदार नरेंद्र मेहता यांच्या इशाºयावर व त्यांच्या उपस्थितीत केलेल्या या कारवाईविरोधात बाधितांसह शिवसेनाही रस्त्यावर उतरल्याचे हाटकेश व एमआय औद्योगिक वसाहतीत दिसून आले.बेकायदा डान्स बार व लॉजना अभय देता, असे खडेबोल सुनावत आधी या बेकायदा बार व लॉजवर कारवाई करावी, अशी मागणी करत सरनाईकांनी पालिका आयुक्त बालाजी खतगावकर यांना शहरातील बेकायदा लॉजची यादी दिली आहे.तिघांवर पिटासारख्या गुन्ह्यांची नोंदभाजपाचे प्रभाग समिती सभापती अरविंद शेट्टी, भाजपा नगरसेवक गणेश शेट्टी व नगरसेविका मीना यशवंत कांगणे आदींशी संबंधित बार व लॉजचा समावेश होता. अरविंद व गणेश तसेच यशवंत कांगणे यांच्यावर तर वेश्या व्यवसाय चालवल्या प्रकरणी पिटासारख्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
बेकायदा बार, लॉजवर कारवाई कधी? प्रताप सरनाईक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 2:36 AM