उल्हासनगर : शहरातील कॅम्प नं. पाचमधील टँकर पाँर्इंट, कानसई रोड व गजानननगर येथील अवैध बांधकामावर सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी व मनीष हिवरे यांच्या पथकाने कारवाई केली. त्याचबरोबर अवैध बांधकामाचे फोटो, पत्ता पाठविण्याचे आवाहन पालिकेने नागरिकांना केल्याने भूमाफियांचे धाबे दणाणले.हजारो अवैध बांधकामे उभी राहिल्यानंतर पालिकेला जाग आली आहे. आता त्याचे फोटो व पत्ता पाठवण्याचे आवाहन पालिकेने केल्याने अशी बांधकामे अस्तित्त्वात असल्यावर शिक्कामोर्तब झाले. पालिका निवडणुकीदरम्यान व त्यानंतरच्या अवैध बांधकामाची चर्चा जोरात सुरू होती. मात्र प्रभाग क्रमांक एक आणि दोनच्या परिसरात शेकडो अवैध बांधकामे उभी राहूनही कारवाई न झाल्याची टीका सहा. आयुक्तांवर सुरू होती. आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्या नागरिकांच्या भेटीत हा विषय आल्याने कारवाई सुरू झाली.
अवैध बांधकामांवर उल्हासनगरात हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 2:45 AM