भार्इंदर : शहरातील नागरिकांना महापालिका नियम आणि एमआरटीपी कायद्याचा धडा शिकवणाऱ्या मीरा- भार्इंदर महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून मात्र चक्क महापालिका मुख्यालयातच नियम डावलून बेकायदा बांधकामे करण्याचा सपाटा सुरू आहे. पालिकेच्या बांधकाम विभागा कडून ही बेकायदा कामे करुन घेताना नगररचना विभागाला विचारलेच जात नसल्याचे उघड झाले आहे. तर बेकायदा बांधकाम करणाºया पालिका अधिकाऱ्यांसह ठेकेदारांवर गुन्हा दाखल करुन कारवाईची मागणी करण्यात आली आहे.महापालिका मुख्यालयाची इमारतच मूळात पूर्वीच्या सरकारी तलावात भराव करुन २० वर्षापूर्वी उभारली आहे. सीआरझेड बाधित ही चार मजली उभारण्यात आलेल्या या इमारतीत मूळ मंजूर नकाशात तळ मजल्यावर पत्रकार कक्ष आणि कॅन्टीनची जागा तसेच वाहने उभी करण्यासाठी स्टील्ट पार्किंग दाखवले आहे. परंतु लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने संगनमत करून स्टील्ट पार्किंगच्या मोकळ्या जागेत चक्क गटनेते आणि समिती पदाधिकाºयांची दालने थाटली आहेत. एकमेव कॅन्टीनही बंद करुन त्यात दालने थाटली आहेत.तळ मजल्यावरचे नागरी सुविधा केंद्र त्यातलाच प्रकार आहे. शिवाय मोकळ्या पार्किंगच्या जागेत देखील आधी वाहनचालकांसाठी व सफाईकामगारांसाठी खोल्या बांधण्यात आल्या. त्या नंतर भाजप प्रणित कर्मचारी पतपेढीसाठी मोठी झाडे तोडून बेकायदा बांधकाम केली गेली. ते कमी म्हणून मोकळ्या पार्किंगच्या जागेत आणखी एक बेकायदा बांधकाम केले गेले. प्रवेशद्वाराजवळही आवक जावकसाठी बेकायदा बांधकाम करण्यात आले. पहिल्या मजल्यावर उत्तरे कडच्या जीन्याकडे जाणाºया मार्गात कार्यालय थाटण्यात आले. तर पूर्वेकडच्या जीन्याच्या पॅसेजमध्येही केबिन उभारण्यात आले आहे.सध्या दुसºया मजल्यावर महापौर दालनाचे नव्याने विस्तारीकरण व सुशोभीकरण करताना उत्तरेकडील जीन्याचा मार्गच बंद करुन टाकण्यात आला आहे. जीन्याकडे येण्याजाण्याच्या मार्गावरच हे अतिक्रमण करुन महापौरांचे अॅन्टी चेंबर बांधले जात आहे. दुसºया मजल्यावरचा जीना बंद केल्या प्रकरणी आयुक्त बालाजी खतगावकर यांनी नगररचना विभागाकडून अभिप्राय मागवला आहे. वास्तविक बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंते असताना नगररचनाकडे विषय पाठवून निव्वळ ढकलाढकली चालत असल्याचे दिसत आहे.हा प्रकार कमी म्हणून की काय शहर अभियंता शिवाजी बारकुंड यांच्यासाठी चक्क चौथ्या मजल्यावर जीन्याच्या पॅसेजमध्येच बाथरुम बांधण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.उधळपट्टीवरून संतापमहापौर डिंपल मेहता आदी पदाधिकाºयांच्या दालनांसाठी सव्वादोन कोटींची उधळपट्टी सुरू असतानाच शहर अभियंता शिवाजी बारकुंड यांच्या दालनाचे सुशोभीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. या साठी सुमारे १५ लाखांची उधळपटट्टी होण्याची माहिती आहे. बारकुंड यांचे दालनही चांगल्या अवस्थेत असताना पालिकेतील लोकप्रतिनिधी व अधिकाºयांनी चालवलेल्या आलिशान दालनांसाठीच्या उधळपट्टीवर टीकेची झोड उठत असतानाच बेकायदा बांधकाम आणि अंतर्गत बदलांवरुन संताप व्यक्त होत आहे.
पालिका मुख्यालयातच बेकायदा बांधकाम, नियम धाब्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 12:25 AM