मनोर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर एकाच दिवसात दोन अवैध क्रॉसिंगवर झालेल्या मोटर अपघातात ३२ वर्षीय एमबीएचा बळी गेला तर दुसऱ्या अपघातात पाचजण गंभीर जखमी झाले. हे अपघात दुर्वेस व वाडाखडकोन गावाच्या हद्दीत घडले. आयआरबी कंपनीच्या गलथान कारभारामुळे सन २०१४-१५ मध्ये फक्त अवैध क्रॉसींगमुळे ९५ अपघताात ४५ लोकांचा मृत्यू तर शेकडो लोक जखमी झाले आहेत. मुंबई-अहमदाबाद महामार्ग क्र. ८ वर वाडाखडकोन गावाच्या हद्दीत पंप वरून डिझेल भरून एक ट्रेलर दोन्ही रस्त्याच्यामध्ये असलेल्या अवैध क्रॉसिंगवरून मुंबई वाहिनीवर जात असताना गुजरात बाजूकडून येणारी कार अचानक त्या ट्रेलरला धडकली. त्यामध्ये विजय गोसावी (३२) रा. दिवाठाणे याचा जागीच मृत्यू झाला. तो घरी परतताना हा अपघात झाला. तसेच दुर्वेस गावाच्या हद्दीत अवैध क्रॉसिंगवर एस.टी बस रस्ता ओलांडत असताना इनोव्हा तिला धडकली. त्यामध्ये पाचजण गंभीर जखमी झाले. मनोर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात मुंबई अहमदाबाद महामार्ग क्र. ८ मेंढवण ते सातिवली २० ते १५ कि. मी. अंतरावर सातिवली, हलोलीपाडोसपाडा, दुर्वेस टाक व्हात, वाडाखड, कोणा असे अनेक ठिकाणी गुजरात व मुंबई वाहिनीच्या मध्यभागी आयआरबी कंपनीकडून अवैध क्रॉसींग ठेवण्यात आले आहे. त्यामुळे एखादे वाहन एका वाहिनीवरून दुसऱ्या वाहिनीवर जात असतांना भरधाव वेगात जाणाऱ्या वाहनांना त्या वाहनांपासून आपले संरक्षण करता येत नाही. त्यातून अपघात घडून अनेकांना प्राण गमवावा लागतो किंवा जायबंदी व्हावे लागते. ही अवैध क्रॉसिंग बंद करण्यासाठी पोलिसांनी आतापर्यंत दहा ते बारा पत्रे दिली आहेत. तरी सुद्धा कोणताही प्रकाराची दखल आयआरबी कंपनी व नॅशनल हायवे अॅथॉरिटीचे अधिकारी घेत नाही. त्यामुळे ही कंपनी अजून किती बळी घेणार अशी चर्चा सध्या प्रवासी व नागरिकांमध्ये सुरू आहे. अशाच प्रकारे घोडबंदर ते तलासरी मार्गावर आतापर्यंत हजारो मोटर अपघता घडून शेकडो लोकाचे प्राण गेले आहेत. ते फक्त आयआरबी कंपनीच्या या जीवघेण्या रस्त्या बांधकामामुळे गेले आहेत. ही क्रॉसिंग बंद करण्याबात नॅशनल हायवे अॅथॉरिटीचे (प्रकल्प) अधिकारी अत्तरदे यांच्याशी संपर्क सधला असता ते म्हणाले की जे अवैध क्रॉसिंग आहेत ते लवकरात लवकर बंद करण्यात येतील. या आधीही दोन्ही रस्त्याच्या मध्यभागी असलेले अवैध क्रॉसिग बंद केले होते. मात्र कोणीतरी क्रॉसिंगचे बांधकाम तोडून पुन्हा येण्याजाण्यासाठी रस्ता तयार केला आहे.
अवैध क्रॉसिंगने इंजिनीअरचा बळी
By admin | Published: December 24, 2015 1:33 AM