लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार सर्व शाळांनी मोफत शिक्षण देणे बंधनकारक असतानाही ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभाग प्रत्येक विद्यार्थ्यांकडून १८५० रुपये फी बेकायदा उकळत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या वर्षी महापालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत ७२८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून अशा प्रकारच्या शुल्कातून पालिकेने १३ लाख ४६ हजार ८०० रुपयांची बेकायदा वसुली केली असल्याचा आरोप स्वराज्य इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी केला. तर ठाणे मतदाता जागरण अभियानानेही विद्यार्थ्यांचे बेकायदा वसूल केलेले पैसे परत करण्याची मागणी केली आहे. ठाणे पालिकेच्या शाळांच्या गलथानपणाने परिसीमा गाठली असून स्वराज इंडियाचे कार्यकर्ते शकील अहमद यांना आपल्या मुलाच्या शाळा प्रवेशाच्या वेळी महापालिका शाळा या शिक्षण अधिकार कायदा पायदळी तुडवीत आहेत हे दिसल्याने हा बेकायदेशीर कारभार उघड करण्याच्या हेतूने त्यांनी गुरुवारी पालक म्हणून काही जणांना शाळेत पाठवून सर्व माहिती गोळा केली. त्यातून अनेक बेकायदेशीर बाबी आणि भयानक वास्तव बाहेर आले आहे. एकीकडे केंद्र सरकारकडून सर्व शिक्षा अभियान राबविण्यात येत आहे. तर दुसरीकडे मात्र पालिकेच्या शाळेच्या शिक्षणाचा दर्जा ढासळत चालला आहे. वर्षाला १८५० रु पये घेतल्यानंतरही मुलांना दर्जेदार सुविधा आणि शिक्षण मिळत नसल्याचे घन: श्याम सोनार यांनी सांगितले. ठाणे पालिकेच्या एकूण पाच इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. या शाळेचा शैक्षणिक दर्जा हा मुंबईच्या पालिका शाळेप्रमाणे असेल असा मानस होता. मात्र इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी आलेल्या मुंबईकराला दिसलेल्या उणिवांनी पालिका शाळेचा दर्जा ढासळल्याचे चित्र दिसत आहे.- शाळेत वह्या, पुस्तके, दूध आणि गणवेश वेळेवर मिळत नाहीत. आरटीआय कायद्याची पायमल्ली करण्यात येत असल्याची प्रतिक्रि या तक्रारदाराने व्यक्त केली. आतापर्यंत जी बेकायदा फी वसूल केली ती परत करावी अशी मागणी करण्यात आली.
पालिकेच्या शााळांकडून बेकायदा फी वसुली
By admin | Published: June 18, 2017 2:17 AM