डोंबिवली : कल्याण-डोंबिवली शहरे, 27 गावांमध्ये सर्रासपणे सुरू असलेल्या बेकायदा बांधकामांवर महापालिका प्रशासनाचा अंकुश राहिलेला नाही. सत्ताधाऱ्यांच्या आदेशांना प्रशासन केराची टोपली दाखवत असल्याने अशा बांधकामांचे इमले उभे राहत आहेत. डोंबिवली पश्चिमेतील ‘ह’ प्रभागांतही अशा बांधकामांचे पेव फुटले आहे. ही बांधकामे त्वरित जमीनदोस्त करावीत, असे पत्र ‘ह’ प्रभाग समिती सभापती वृषाली रणजीत जोशी यांनीही बेकायदा बांधकामविरोधी विभागाचे उपायुक्त यांना मार्चमध्ये दिले आहे. परंतु, प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही, असे जोशी यांनी सांगितले.‘ह’ प्रभागातील मोठागाव, कोपरगाव, कुंभारखाणपाडा, देवीचा पाडा, सत्यवान चौक, गरीबाचा वाडा, आनंद नगर, जुनी डोंबिवली आदी भागामध्ये मोठय़ा प्रमाणावर बेकायदा चाळी आणि इमारती उभ्या राहत आहेत. ही बांधकामे तातडीने जमीनदोस्त करावीत. अशा बांधकामांबाबत तक्रार करूनही ती सुरू राहिल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी महापालिका अधिकाऱ्यांची असेल, असा इशाराही जोशी यांनी पत्रत दिला आहे. केवळ ‘ह’ प्रभाग समितीच नव्हे तर एकंदरीतच प्रभाग समितीच्या सभापतींना कोणतेही विशेष अधिकार नाहीत. हे पद केवळ नावाला आहे. अधिकार नसतील तर असे पद हवेच कशाला, असा सवाल रणजित जोशी यांनी केला. बेकायदा बांधकामांबरोबरच प्रभागातील स्वच्छता, भटक्या कुत्र्यांचा प्रश्न, आरोग्य, रस्ते, पाणीपुरवठा आदी विविध समस्यांबाबत अधिका:यांना पत्रे दिली जातात. मात्र, ते त्यांना केराची टोपली दाखवत असतील तर त्याचा अर्थ काय? सभापतींनी दिलेल्या पत्रंची, सूचनांची दखल तेवढय़ाच गांभीर्याने घेणो आवश्यक आहे, पण तसे होत नाही. मार्चमध्ये पत्र दिले, त्यानंतर सातत्याने यावर चर्चा झाली. मात्र, कोणतीही कार्यवाही झाली नाही. हा दोन महिन्यांचा अनुभव असल्याचे ते म्हणाले.
डोंबिवलीतील बेकायदा बांधकामे रोखण्यासाठी प्रशासनाकडून सक्त आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 10:08 PM