ठाणे उत्पादन शुल्क विभागानं कोचीवेल्ली-पोरबंदर एक्स्प्रेसमधून दारुच्या तब्बल 1 हजार बाटल्या जप्त केल्या आहेत. रेल्वेतील प्रसाधनगृहावरील जागेत या बाटल्या ठेवण्यात आल्या होत्या. एक्स्प्रेसमधून अवैध दारुची वाहतूक होत असल्याची खात्रीलायक माहिती ठाणे उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. यानंतर ही कारवाई करण्यात आली. कोचीवेल्ली-पोरबंदर एक्स्प्रेस दिवा ते खारबाव दरम्यान स्लो झाल्यावर अवैध दारुचा साठा ट्रॅकवर उतरवण्यात येणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे कर्मचाऱ्यांनी बोगीत प्रवेश केला. यानंतर त्यांनी बोगीची तपासणी केली असता, प्रसाधनागृहावरील जागेत त्यांना दारुचा साठा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या साठ्याचं मूल्य 89 हजार 320 रुपये आहे. गोव्यात या दारुची विक्री केली जाणार होती. ठाणे उत्पादन शुल्क च्या विभागाच्या वतीने एस. पी. नितीन घुले यांनी ही कारवाई केली.
एक्स्प्रेसच्या प्रसाधनगृहावर सापडल्या दारुच्या एक हजार बाटल्या; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2018 7:47 PM