- अनिकेत घमंडी, डोंबिवलीकल्याण-डोंबिवलीत स्वाईन फ्ल्यूसह डेंग्यूची साथ असतांनाच कच-याची विल्हेवाट आणि घाणीची स्वच्छता वेळेवर न झाल्यानेही प्रभाग क्र. ६७ मध्ये आजार बळावले आहेत. डोंबिवली पश्चिमेच्या महाराष्ट्र नगर मध्ये अशाच विविध कारणांनी नागरिक हैराण झाले आहेत. चाळींसह काही इमारतींमधील रहिवाशांना हा त्रास होत असून महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे.हाकेच्या अंतरावर असलेले ‘ह’ प्रभाग क्षेत्र कार्यालय नावालाच असल्याचे यावरुन स्पष्ट होत आहे. दोन पाण्याच्या टाकीनजीकच्या खेळाच्या मैदानातही गुढघाभर गवत उगवले असून तेथेही डासांचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर आहे. त्यात काही ठिकाणच्या गटारींच्या मॅन होलवर तसेच चेंबरवर झाकणे न लावल्याने दुर्गंधीसह पाणी बाहेर रस्त्यावर येत असल्याचे दिसून आले. त्या गटारी बंदिस्त करण्यासाठी रस्त्यासह अन्य तांत्रिक अडचणी असल्याचे सांगण्यात आले. पाण्याच्या टाकीनजीकच कुंडी असून सदान्कदा तीच्यातून कचरा भरल्याने तो नजीकच्या रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरतो. त्याचाही त्रास वाहनचालकांसह पादचा-यांना होतो. काही वर्षांोूर्वी महापालिकेने कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी डोंबिवलीसह कल्याणमधील काही प्रभागांमध्ये कंत्राटी पद्धतीवर काम दिले होते. मात्र काही लोकप्रतिनिधींनी ते काम चांगल्या पद्धतीने होत नसल्यासह अन्य कारणे देत त्याचे काम बंद पाडले. त्यामुळे आता पुन्हा महापालिकेच्या स्वच्छता कर्मचा-यांवर त्याचा भर पडला. आधीच अपु-या कर्मचा-यांमुळे स्वच्छतेसह अन्य विभागांचे तीनतेरा वाजलेले आहेत. त्यात कामाचा व्याप वाढल्यास जी स्वच्छता होत होती तिचाही बो-या वाजला. या वॉर्डात अपुरे सफाई कामगार असल्याने स्वच्छता होत नसल्याची टिका नागरिकांकडून होत आहे. तसेच काही ठिकाणी गवत वाढल्याने तेथेही डासांची अंडी घालण्यात येतात, पावसाचीही उघडीप मिळाल्याने अशा ठिकाणी साठलेल्या पाण्यामध्ये डास वाढीस लागतात. त्याच्या सोबतील कचरा त्यामुळे येथिल रहिवाश्यांच्या आरोग्याचा प्रश्न अतिशय गंभिर झाला आहे. या ठिकाणी बहुतांशी प्रमाणात चाळींची वस्ती असल्याने बैठी घरेच आढळून येतात. त्यामुळे डासांसह अन्य साथ रोग पसरण्यास वाव मिळत असल्याचे नागरिक सांगतात. स्वच्छता धाब्यावर बसवण्यात आल्याने ते प्रमाण वाढीस लागते. पाण्याची समस्या फारशी भेडसावत नसली तरीही ज्या ठिकाणी दोन पाण्याच्या टाक्या आहेत त्या ठिकाणची एक जुनी टाकी असून त्यातील दोन पाण्याच्या लाइनीतून पाणी गळत असते. परिणामी हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होतो. याकडेही महापालिकेचे लक्ष नसल्याची टीका करण्यात आली. गळती लागलेल्या जलकुंभाची तातडीने डागडुजी करण्यात यावी, सध्या तरी पाण्याची लाइनच दुरुस्त करावी लागणार असली तरी याकडे काणाडोळा झाल्यास ती समस्या वाढेल. भविष्यात त्याचा परिसरातील नागरिकांनाच त्रास होइल. या मुलभूत गरजेकडे लक्ष न दिल्याने परिसरात साथीच्या रोगांनी थैमान घातले आहे. ज्या कंत्राटदाराला आधी कचरा उचलण्याचे काम दिले होते, त्यास काही नगरसेवकांनीच विशिष्ट हेतूने काढले . या ठिकाणी अस्वच्छेतेमुळे आजार बळावलेत, त्याला कारणही महाापालिकाच आहे. जो ठेकेदार होता तो महाराष्ट्रासह देशाबाहेर चांगल्या पद्धतीने काम करित आहे, तेथे तो हेच काम करत आहे. तेथे का नाही अडचणी आल्या, यावरुनच काय ते स्पष्ट होत आहे. आमच्या कुटुंबातील मंडळीही आजारी पडली आहेत.- वामन म्हात्रे, नगरसेवक
महाराष्ट्रनगरमध्ये बळावले आजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2015 11:25 PM