ज्या बाप्पांचे मोठ्या आनंदाने स्वागत केले जाते, त्याचे विसर्जन मात्र अत्यंत भावपूर्णपणे केले जाते. तसेच गौराईंचे आगमन तिसऱ्या दिवशी होते. मात्र अडीच दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन गौरी यायच्या आधीच केले जात असल्याने गौरी आणि गणपती या मायलेकांची भेट होत नसल्याचे बोलले जाते.
-------------
अशी आहे खेड्यापाड्यातील गौराई आगमनाची प्रथा.
घरातील लहान मूल घरात कुणी लहान नसेल, तर दुसऱ्याच्या घरातील लहान मुलाला हा मान दिला जातो. तो मुलगा म्हणजे गौरीचा भाऊ समजला जातो. खांद्यावर ती नैसर्गिक फुलांची गौरी घेऊन तो दाराजवळ येतो. तेथे घरातील महिला त्याची व त्या गौराईची ओवाळणी करतात. त्याचे पूजन करून स्वागत करतात आणि त्या फुलोऱ्याला घरात घेऊन सजवलेल्या मडक्यात ठेवतात. त्या मडक्यात तांदूळ, सुटे पैसे, करंडा, फणी, सुपारी हे सर्व ठेवून मग घरात कुंकवाच्या साहाय्याने ती गौर चालवली जाते.