चिकणघर : अडगळीच्या आणि असुविधांच्या गर्तेत लसीकरण केंद्र सुरू केल्याने लस घ्यायला आलेल्या लोकांनी नाराजी व्यक्त केली. शनिवारी मनपाने लोकांना कोरोना प्रतिबंधक लस मिळावी म्हणून बिर्ला कॉलेजच्या मागे भाऊराव पोटे विद्यालयात लसीकरण केंद्राची व्यवस्था केली; मात्र येथे धड रस्ता नाही. शाळेच्या प्रांगणात जागोजागी चिखलमय पाणी साठलेले, त्यावर तरंगणारे डास, गवताची झुडुपे वाढलेली असल्याने कोरोनापासून बचाव व्हावा म्हणून लस घेण्यास आलेले नागरिक डेंग्यू, मलेरियाची भीती व्यक्त करीत होते.
शाळा गेले दीड वर्ष बंद असल्याने भोवताली साफसफाईच्या अभावामुळे दुर्गंधीचा सामना करावा लागला. याचा वृद्ध लाभार्थ्यांना अधिक त्रास सहन करावा लागला. तर काही नागरिक लस न घेताच परतल्याचे एका नागरिकाने सांगितले. प्रशासनाने लसीकरण केंद्राची पूर्वपाहणी न करता केंद्र सुरू केल्याने अशी परिस्थिती उद्भवल्याचा आरोपही लसीकरणासाठी आलेल्या लोकांनी केला आहे. याबाबत विचारणा करण्यासाठी मनपाच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ताे होऊ शकला नाही.
040921\img-20210904-wa0028.jpg
अडगळीच्या जागी लसकरण केंद्र
नागरीकांनी व्यक्त केली नाराजी...या बातमी साठी फोटो