अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: पेट्रोल डिझेलची वाहतुक करणाऱ्या डीलर्सने पुकारलेल्या संपाचा परिणाम मंगळवारी सकाळीच ठाण्यात जाणू लागला. पेट्रोल नसल्याने ठाणे शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या तीन पेट्रोल पंप परिसरातील दोन्ही पेट्रोल पंप सकाळपासूनच काही तासांच्या अंतरावर बंद झाल्याचे पाहण्यास मिळून आले. त्यामुळे इतर पेट्रोलपंपावर वाहन चालकांनी धाव घेतल्याने तेथे विशेष करून दुचाकी वाहन चालकांची तोबा गर्दी झाली होती. तसेच वाहन चालकांनी पेट्रोल गाडी टाकण्यासाठी लांबचलांब रांगा लावण्याचे प्रखरपणे दिसून आले.
शहरातील इतर ठिकाणी असलेल्या पेट्रोल पंप धारकांकडे स्वतःचे पेट्रोल आणणारे वाहने असल्याने त्या पंपावर पेट्रोल उपलब्ध होते. त्या ठिकाणी वाहन चालक गाड्यांच्या टाक्या फुल करताना बाटल्या आणि कॅन मध्ये पेट्रोल नेताना दिसत होते.
सोमवारी पेट्रोल वाहून नेणाऱ्या डीलर्सने संप पुकारल्याने मंगळवारी सकाळीच तीन पेट्रोल पंप येथील पेट्रोल संपल्याने एक पंप बंद झाला होता. त्यानंतर काही अंतरावर असलेल्या आणखी एक पंप बंद करण्याची वेळ त्या पेट्रोल पंप धारकावर आली. तर जे पेट्रोल बंद झाले होते. त्या पेट्रोल पंपाच्या ठिकाणी ओन्ली डिझेल असे बोर्ड लावण्यात आले होते. तसेच पंपावरील कर्मचारी येणाऱ्या वाहन चालकांना पेट्रोल संपल्याचे सांगताना दिसून आले. जोपर्यंत पेट्रोल आणि डिझेल आहे, तोपर्यंत पंप सुरू राहतील. त्यानंतर मात्र ते बंद करावे लागतील असाचा सूर पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांशी बोलताना दिसून आला.
काही पेट्रोल पंपावरील पेट्रोल संपले आहे. हे समजल्याने तातडीने गाडी घेऊन पेट्रोल पंपावर धाव घेतली आणि थेट गाडीची टाकी फुल केल्याचे वाहन चालकांकडून सांगण्यात आले. पेट्रोल बाटली आणि कॅनमध्ये
आज पेट्रोल संपल्यावर उद्या पेट्रोल मिळेल की नाही या भीतीने काही वाहन चालक नामी शल्लक लढविताना दिसून आले. कोणी वाहन चालक जवळच गाडी बंद पडली आहे सांगून पेट्रोल बाटली तसेच कॅनमध्ये भरून नेताना दिसून येत होते. तसेच पेट्रोल पंपावर अशाप्रकारे पेट्रोल मिळत असल्याने चालकांनी गर्दी केल्याचे पाहण्यास मिळाले.