ठाणे : अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांच्या ग्रेड पेमधील त्रुटी दूर करून त्यांना नियमानुसार असलेली ग्रेड पे लागू करण्यात आली आहे. यासाठी महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यानिमित्ताने गुरुवारी या सर्व कर्मचाºयांनी म्हस्के यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.
ठाणे महापालिका अग्निशमन दलातील कर्मचाºयांना नॉन क्वालिफाय ऑफिसर या पदासाठी नियमानुसार ४२०० रुपये ग्रेड पे असतानादेखील त्यांना २४०० रुपये ग्रेड पे देण्यात येत होती. वास्तविक पाहता, अग्निशमन विभाग हा अत्यावश्यक सेवेतंर्गत येत असून या विभागातील कर्मचारी २४ तास महापालिकेला सेवा देत असतात.
परंतु, त्यांना नियमानुसार देय असलेली रक्कम वारंवार पाठपुरावा करूनदेखील मिळत नव्हती. यासाठी महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केल्याने प्रशासनाने ग्रेड पे लागू करण्यास मान्यता दिली असून मागील चार महिन्यांपासून या वेतनश्रेणीचा लाभ कर्मचाºयांना मिळण्यास सुरुवात झाली आहे.‘अन्याय होणार नाही’
महापालिकेच्या आस्थापनेवर कार्यरत असलेल्या नियमानुसार देय असलेली रक्कम मिळालीच पाहिजे, हे कर्मचारी सेवा देत असून अप्रत्यक्षरित्या शहराच्या विकासामध्ये हातभार लावत असतात. त्यांना नियमानुसार देय असलेली रक्कम मिळत नसल्याने मानसिक खच्चीकरण होते यासाठी आपण यापुढेही ज्या कर्मचाºयांवर अन्याय होत असेल त्यांना योग्य तो न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हस्के यांनी यावेळी स्पष्ट केले.